फुरसुंगी कचरा डेपोला आग हेतूपरस्पर आग लावल्याचा आरोप

By admin | Published: February 8, 2015 11:40 PM2015-02-08T23:40:33+5:302015-02-08T23:40:33+5:30

फुरसुंगी : फुरसुंगी उरूळीदेवाची येतील कचरा डेपोवरील हंजर प्रक्रिया प्रकल्पातील कचर्‍याला रविवारी सकाळी मोठी आग लागली. अग्निशामक दलाच्या जवानांनी मोठया प्रयासाने आग आटोक्यात आणली. मात्र हा कचरा प्रकल्पात कचरा टाकणे अनेक दिवसांपासून बंद असताना आग लागली कशी असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कचराप्रकल्पामध्ये हेतूपरस्पर आग लावण्यात आल्याचा आरोप स्थानिक गावकर्‍यांनी केला आहे.

The accusation of burning a fire on the furusungi garbage depotola fire | फुरसुंगी कचरा डेपोला आग हेतूपरस्पर आग लावल्याचा आरोप

फुरसुंगी कचरा डेपोला आग हेतूपरस्पर आग लावल्याचा आरोप

Next
रसुंगी : फुरसुंगी उरूळीदेवाची येतील कचरा डेपोवरील हंजर प्रक्रिया प्रकल्पातील कचर्‍याला रविवारी सकाळी मोठी आग लागली. अग्निशामक दलाच्या जवानांनी मोठया प्रयासाने आग आटोक्यात आणली. मात्र हा कचरा प्रकल्पात कचरा टाकणे अनेक दिवसांपासून बंद असताना आग लागली कशी असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कचराप्रकल्पामध्ये हेतूपरस्पर आग लावण्यात आल्याचा आरोप स्थानिक गावकर्‍यांनी केला आहे.
फुरसुंगी येथील कचरा डेपोवर शहरातील कचरा टाकण्यात १ जानेवारी २०१५ पासून मज्जाव करण्यात आला आहे. काही अटींची पूर्तता केल्यानंतर कचरा टाकू देऊ अशी भूमिका गावकर्‍यांनी घेतली आहे. यापार्श्वभुमीवर सकाळी कचरा डेपोमध्ये मोठी आग लागली. हडपसर, कात्रज येथील अग्निशामक दलाच्या गाडया तातडीने घटनास्थळी पाठविण्यात आल्या. दोन तासाच्या प्रयत्नानंतर त्यांनी आग आटोक्यात आणली. मात्र कचर्‍याची आग खाली खोलपर्यंत पसरलेली असल्याने कचर्‍यावर पाणी फवारण्याचे काम दिवसभर सुरू होते. तसेच पुन्हा अचानक आगीने पेट घेतल्यास खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशामक दलाच्या दोन गाडया रात्रभर कचरा डेपोवर ठेवण्यात आल्या.
साधारणत: उन्हाळयात कचर्‍यात मिथेन वायू तयार झाल्याने आग लागण्याच्या घटना घडतात. मात्र फुरसुंगी येथील कचरा प्रकल्प बंद आहे, तिथे कामगारही नाहीत. मात्र तरीही हिवाळयामध्ये तिथे आग कशी लागली असा प्रश्न गावकर्‍यांकडून उपस्थित केला जात आहे. ही आग लागली नसून लावली गेल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे. येथील कचरा कमी करण्यासाठी हा प्रकार करण्यात येत आहे. असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. वार्‍यामुळे ही आग जास्तच भडकत आहे. या धुराचे लोट मंतर वाडी कात्रज बा‘ वळण रस्त्यावर येत आहेत . त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. याशिवाय येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: The accusation of burning a fire on the furusungi garbage depotola fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.