अल्वर प्रकरणातील आरोपी आजच्या जमान्यातील भगत सिंग - साध्वी कमल
By admin | Published: April 20, 2017 12:26 PM2017-04-20T12:26:55+5:302017-04-20T12:36:34+5:30
स्वयंघोषित गोरक्षक साध्वी कमल यांनी अल्वर प्रकरणातील आरोपींची भगत सिंग आणि चंद्रशेखर आझाद यांच्याशी तुलना केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. 20- स्वयंघोषित गोरक्षक साध्वी कमल यांनी अल्वर प्रकरणातील आरोपींची भगत सिंग आणि चंद्रशेखर आझाद यांच्याशी तुलना केली आहे. या प्रकरणातील आरोपी विपिन यादव सोमवारी परिक्षा देण्यासाठी बेहरोर येथील कॉलेजमध्ये आला असताना साध्वी कमल यांनी त्याची भेट घेऊन कौतुक केले. विपिनला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
तू आजच्या जमान्यातील भगत सिंग, चंद्रशेखर आझाद आहेस. संपूर्ण देश तुझ्यासोबत आहे. आपण आपल्या देशात असे काम करणार नाही तर दुसरीकडे कुठे करणार. तू कुठलीही चिंता करु नकोस असे साध्वी त्याला म्हणाल्या. 1 एप्रिल रोजी कथित गोरक्षकांनी अल्वर येथे गायींची तस्करी करत असल्याच्या संशयातून केलेल्या मारहाणीत पहलू खान या शेतक-याचा मृत्यू झाला होता आणि चार जण जखमी झाले होते. विपिन यादव या प्रकरणातील एक आरोपी आहे.
तुरुंगात नुसता बसून राहू नकोस, गोरक्षणाचा संदेश दे. तुरुंगात सगळयांना जय गो माता बोलायला शिकव. मागच्या महिन्यात साध्वी कमल आणि तिच्या समर्थकांनी जयपूर येथे एका हॉटेलमध्ये बीफ पार्टी चालू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिथे धाड टाकली होती.