देवाची मूर्ती तोडल्यानंतर झाला आरोपीचा मृत्यू, पोलीस तपासात समोर आली धक्कादायक बाब

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 01:42 PM2023-11-23T13:42:05+5:302023-11-23T13:42:48+5:30

Jharkhand News: झारखंडमधील मुडमा गावामध्ये चार मंदिरातील मूर्तींची मोडतोड केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. मात्र आरोपींवर मूर्ती तोडल्याचा नाही, तर पुरावे लपवल्याचा आरोप आहे.

Accused died after breaking the idol of God, police investigation revealed a shocking fact | देवाची मूर्ती तोडल्यानंतर झाला आरोपीचा मृत्यू, पोलीस तपासात समोर आली धक्कादायक बाब

देवाची मूर्ती तोडल्यानंतर झाला आरोपीचा मृत्यू, पोलीस तपासात समोर आली धक्कादायक बाब

झारखंडमधील मुडमा गावामध्ये चार मंदिरातील मूर्तींची मोडतोड केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. मात्र आरोपींवर मूर्ती तोडल्याचा नाही, तर पुरावे लपवल्याचा आरोप आहे. याबाबत पोलिसांनी जी माहिती दिली आहे, त्यानुसार सुखदेव उरांव उर्फ जट्टू याने मुडमा गावामध्ये असलेल्या चार मंदिरातील मूर्तींची मोडतोड केली होती.

मिळत असलेल्या माहितीनुसार देवतांच्या मूर्ती भंग केल्यानंतर सुखदेव घरी निघून गेला. तिथे त्याने नातेवाईकांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी त्याला मारहाण केली. त्याचदरम्यान सुखदेवला मिरगीचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. बादमा येथे मूर्तीभंग केल्याची वार्ता परिसरात वेगाने पसरली. त्यानंतर लोकांचा संताप अनावर झाला. तसेच संपूर्ण मांडर परिसरात जमावाने रास्ता रोको केलं.

तर मृत तरुणाच्या नातेवाईकांना या संपूर्ण घटनेची माहिती होती. मात्र त्यांनी पोलिसांना मूर्तीच्या तोडफोडीबाबत कुठलीही माहिती दिली नाही. तसेच मृत सुखदेव उरांव याचा मृतदेहही जाळून टाकला. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा एक एक कडी जुळत गेली. त्यानंतर पोलीस सुखदेवच्या घरी पोहोचले आणि त्यांनी नातेवाईकांची चौकशी केली.

सुरुवातीला नातेवाईकांनीप पोलिसांना काहीही सांगितले नाही. तसेच कुठलीही माहिती दिली नाही. मात्र पोलिसांनी आपला खाक्या दाखवल्यानंतर नातेवाईकांचा संयम सुटला. सुखदेव उरांवचे भाऊ एतवा आणि सोमा उरांव  एतवा और सोमा उरांव यांनी पोलिसांना सर्व माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना पुरावे लपवल्याच्या आरोपाखाली अटक केली.

या प्रकरणाची माहिती देताना पोलीस अधिकारी मनीष टोप्पो यांनी सांगितले की, पोलिसांना अनेक टेक्निकल पुरावे सापडले आहेत. तसेच आरोपींनी पोलिसांना सांगितले की, मुडमा येथील जत्रेत दुकान लावण्यावरून काही लोकांसोबत वाद झाला होता. त्यामुळे दारुच्या नशेत सुखदेव याने मूर्तीची तोडफोड केली. सुखदेव मानसिकदृष्ट्या कमकुवत होता, अशी माहिती समोर येत आहे.  

Web Title: Accused died after breaking the idol of God, police investigation revealed a shocking fact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.