पालकमंत्र्यांच्या घरासमोरील उपोषण उधळले गुन्हा दाखल: कार्यकर्त्यांनी दादागिरी केल्याचा आरोप

By admin | Published: April 8, 2016 12:04 AM2016-04-08T00:04:13+5:302016-04-08T00:04:13+5:30

जळगाव : धरणगाव तालुक्यातील नारणे ग्रामपंचायतीतील विविध कामात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीकडे होणार्‍या दुर्लक्षाबाबत पालकमंत्र्यांकडून न्याय मिळावा म्हणून डॉ. सरोज पाटील, सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील, अनिल नाटेकर यांनी पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या निवास्थानासमोर उपोषणास बसण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराची माहिती मिळाल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन उपोषण उधळले. यावेळी तणाव निर्माण झाल्याने रामानंद नगर पोलिसांनी परवानगी न घेता उपोषण करणार्‍यांना ताब्यात घेऊन अटक केली.

Accused of feloning the house of guardian minister, filed a complaint: The activists alleged that they were being lenient | पालकमंत्र्यांच्या घरासमोरील उपोषण उधळले गुन्हा दाखल: कार्यकर्त्यांनी दादागिरी केल्याचा आरोप

पालकमंत्र्यांच्या घरासमोरील उपोषण उधळले गुन्हा दाखल: कार्यकर्त्यांनी दादागिरी केल्याचा आरोप

Next
गाव : धरणगाव तालुक्यातील नारणे ग्रामपंचायतीतील विविध कामात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीकडे होणार्‍या दुर्लक्षाबाबत पालकमंत्र्यांकडून न्याय मिळावा म्हणून डॉ. सरोज पाटील, सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील, अनिल नाटेकर यांनी पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या निवास्थानासमोर उपोषणास बसण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराची माहिती मिळाल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन उपोषण उधळले. यावेळी तणाव निर्माण झाल्याने रामानंद नगर पोलिसांनी परवानगी न घेता उपोषण करणार्‍यांना ताब्यात घेऊन अटक केली.
धरणगाव तालुक्यातील नारणे येथील ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा योजना, स्मशानभूमी व रस्ता, निर्मल ग्राम योजना अशा विविध कामात लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप करून डॉ. सरोेज पाटील यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या. मात्र त्यांनी दखल न घेतल्याने विभागीय आयुक्तांकडे धाव घेण्यात आली मात्र तेथेही न्याय न मिळाल्याने पालकमंत्र्यांकडून न्याय मिळावा म्हणून शिवराम नगरातील पालकमंत्र्यांच्या निवास्थानी उपोषणाचा निर्णय घेतला.
कार्यकर्ते आल्याने तणाव
उपोषणकर्त्या डॉ. सरोज पाटील व अन्य दोघांनी सकाळी ११ वाजेच्या सुमारास उपोषणास सुरुवात करताच नगरसेवक सुनील माळी, रवींद्र पाटील, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, दीपक फालक, अमित चौधरी, सुनील खडके यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी येऊन उपोषणकर्त्यांना हटकले. हे खडसे यांचे खाजगी निवास्थान असल्याने विषय जिल्हा परिषदेचा असल्याने तेथे उपोषणास बसावे असे सांगत असताना दोघा गटांमध्ये वाद सुरू झाला. या दरम्यान, रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण वाडिले व अन्य कर्मचारी या ठिकाणी आले. उपोषणास परवानगी नसल्याने उपोषणकर्त्यांना बरोबर घेऊन त्यांनी पोलीस स्टेशनला नेले.
----

Web Title: Accused of feloning the house of guardian minister, filed a complaint: The activists alleged that they were being lenient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.