गोळीबार प्रकरणातील आरोपीस जामीन
By admin | Published: March 23, 2016 12:12 AM2016-03-23T00:12:09+5:302016-03-23T00:12:09+5:30
जळगाव : भुसावळ येथील न्यायालयाच्या आवारात झालेल्या गोळीबार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीस मंगळवारी न्यायाधीश आर.बी. ठाकूर यांच्या न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. घटनेनंतर १७ डिसेंबर २०१५ रोजी या आरोपीस अटक झाली होती. अटकेनंतर तो रिमांड होममध्ये होता. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड.आशा शर्मा यांनी तर आरोपीतर्फे ॲड.राशीद पिंजारी यांनी काम पाहिले.
Next
ज गाव : भुसावळ येथील न्यायालयाच्या आवारात झालेल्या गोळीबार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीस मंगळवारी न्यायाधीश आर.बी. ठाकूर यांच्या न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. घटनेनंतर १७ डिसेंबर २०१५ रोजी या आरोपीस अटक झाली होती. अटकेनंतर तो रिमांड होममध्ये होता. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड.आशा शर्मा यांनी तर आरोपीतर्फे ॲड.राशीद पिंजारी यांनी काम पाहिले.अल्पवयीन आरोपीची रिमांड होममध्ये रवानगीजळगाव : अल्पवयीन बालकावर अत्याचार करून त्याला विहिरीत फेकणार्या जामनेर येथील एका अल्पवयीन आरोपीची मंगळवारी न्यायालयाने रिमांड होममध्ये रवानगी केली. जामनेर शिवारात बोदवड रस्त्यावर असणार्या शेतातील विहिरीत अत्याचारग्रस्त बालकाचा मृतदेह आढळला होता. ही घटना १९ रोजी घडली होती. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३६३, ३०२, २०१ सह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ११ (१) १२ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.तीन आरोपींची कारागृहात रवानगीजळगाव : मन्यारखेडा, ता.भुसावळ येथील आनंदा पंडित तावडे यांच्यासह त्यांच्या मित्रास अडवून त्यांच्याकडून किमती ऐवज जबरीने हिसकावणार्या तिघांची न्यायालयाने कारागृहात रवानगी केली. किरण कैलास पाटील (२५, रा.पुणे), विकास हनुमंत पठारे (२२, रा.मेहरूण, जळगाव) व राुहल मधुकर शिंदे (२१, रा.सुप्रिम कॉलनी, जळगाव) अशी तिन्ही संशयितांची नावे आहेत. त्यांना न्यायाधीश शिंदे यांच्या न्यायालयात हजर केले होते. आरोपीतर्फे ॲड.एस.सी. पावसे यांनी तर सरकारतर्फे ॲड.अनिल पाटील यांनी काम पाहिले.बलात्कार्यास न्यायालयीन कोठडीजळगाव : अल्पवयीन मुलीस पळवून नेत तिच्यावर बलात्कार करणारा संशयित आरोपी चेतन चंद्रकांत चौधरी (रा.जोशीवाडा, जळगाव) यास न्यायाधीश के.बी. अग्रवाल यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७६, ३६३, ३२४, ५०४ सह पोस्को ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीतर्फे ॲड.एस.सी. पावसे यांनी तर सरकारतर्फे ॲड.संभाजी जाधव यांनी काम पाहिले.