दंगलीतील सूत्रधाराला अखेर अटक महिनाभरापासून होता फरार : गोलाणी मार्केट दगडफेक प्रकरण
By admin | Published: July 29, 2016 11:38 PM2016-07-29T23:38:50+5:302016-07-29T23:38:50+5:30
जळगाव : गोलाणी मार्केटमध्ये घुसून दगडफेक करीत दुकानांमधील साहित्यासह फलकांची नासधूस केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ातील प्रमुख सूत्रधार संशयित आरोपी डॉ.मोबिन खलील अहमद अशरफी (वय ४८, रा.गेंदालाल मिल, जळगाव) यास शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचार्यांनी शुक्रवारी साडेचार वाजेच्या सुमारास एमआयडीसी परिसरातून अटक केली.
Next
ज गाव : गोलाणी मार्केटमध्ये घुसून दगडफेक करीत दुकानांमधील साहित्यासह फलकांची नासधूस केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ातील प्रमुख सूत्रधार संशयित आरोपी डॉ.मोबिन खलील अहमद अशरफी (वय ४८, रा.गेंदालाल मिल, जळगाव) यास शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचार्यांनी शुक्रवारी साडेचार वाजेच्या सुमारास एमआयडीसी परिसरातून अटक केली.व्हॉटस् ॲपवर आक्षेपार्ह संदेश टाकल्याच्या निषेधार्त २४ जून रोजी दुपारी ३ वाजता काही तरुणांनी गोलाणी मार्केटमध्ये घुसून दगडफेक करीत तेथील दुकानांमधील साहित्यासह फलकांची नासधूस केली होती. याप्रकरणी २५ जून रोजी मनीष प्रकाश कुकरेजा (२१, रा.सिंधी कॉलनी, जळगाव) याच्या फिर्यादीवरून ४१ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ात शहर पोलिसांनी आतापर्यंत १७ जणांना अटक केली आहे. हा गुन्हा घडल्यापासून प्रमुख सूत्रधार असलेला संशयित आरोपी डॉ.मोबिन अशरफी हा फरार होता. तो एमआयडीसी परिसरात आल्याची माहिती या गुन्ाचे तपासाधिकारी सहायक पोलीस निरीक्षक आशीष रोही यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकाच्या कर्मचार्यांना अटकेसाठी पाठवले होते. पोलिसांनी अशरफी याला शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता अटक केली. या गुन्ातील दुसरा फरार संशयित डॉ.पिरजादे (पूर्ण नाव माहिती नाही) हा अद्यापही फरार आहे.