'पद्मावत' बघायला गेलेल्या तरूणीवर थिएटरमध्ये बलात्कार, आरोपी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2018 10:45 AM2018-02-02T10:45:34+5:302018-02-02T10:47:09+5:30
हैदराबादमध्ये सिनेमा थिएटरमध्ये एका 19 वर्षीय तरूणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.
हैदराबाद- तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये सिनेमा थिएटरमध्ये एका 19 वर्षीय तरूणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी सोशल मीडियावर मैत्री झालेल्या एका मुलाबरोबर हैदराबादच्या प्रशांत थिएटरमध्ये पद्मावत सिनेमा पाहायला गेली होती. तिथे तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप आहे.
सर्कल इंस्पेक्टरने दिलेल्या माहितीनुसार. पीडित तरूणीवर थिएटरच्या आतमध्ये बलात्कार झाला. दोन महिन्याआधी पीडित तरूणी आणि आरोपीची सोशल मीडियावर मैत्री झाली होती. थिएटरमध्ये त्यावेळी काही लोकच उपस्थित होती. जास्त थिएटर रिकामं असल्याने आरोपीने त्याचा फायदा घेत तरूणीवर बलात्कार केला.
याप्रकरणी आरोपीला 31 जानेवारी रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर लगेचच त्याची रवानगी न्यायलयीन कोठडीत करण्यात आली. पीडित तरूणी जखमी झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांनी 376 कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला असून बेजबाबदार वागणुकीसाठी थिएटर मालकाविरोधात कारवाई केली आहे.
कंदकतला बीक्शापथी असं आरोपीचं नाव असून तो 23 वर्षांचा आहे. जनगाव जिल्ह्यात तो ड्रायव्हरचं काम करतो. वीस दिवस आधी पीडित तरूणी व आरोपीची सिकंदराबाद रेल्वे स्थानकाजवळच्या एका हॉटेलमध्ये पहिल्यांदा भेट झाली होती.