मोहम्मद रफींच्या मुलाचा मोदींच्या सत्तेत मुस्लिम सुरक्षित नसल्याचा आरोप

By admin | Published: February 28, 2016 05:56 PM2016-02-28T17:56:56+5:302016-02-28T17:56:56+5:30

अल्पसंख्यांक आणि त्यातही मुस्लिम समाज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सत्तेत असुरक्षित असल्याचं दिवंगत गायक मोहम्मद रफी यांचा मुलगा शाहीद रफी यांनी म्हणल आहे

The accused of Mohammed Rafi's son is not safe in Modi's power | मोहम्मद रफींच्या मुलाचा मोदींच्या सत्तेत मुस्लिम सुरक्षित नसल्याचा आरोप

मोहम्मद रफींच्या मुलाचा मोदींच्या सत्तेत मुस्लिम सुरक्षित नसल्याचा आरोप

Next
>ऑनलाइन लोकमत - 
आग्रा (नवी दिल्ली), दि. २८ - अल्पसंख्यांक आणि त्यातही मुस्लिम समाज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सत्तेत असुरक्षित असल्याचं दिवंगत गायक मोहम्मद रफी यांचा मुलगा शाहीद रफी यांनी म्हणल आहे. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मोहम्मद रफी यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. 
 
ताज साहित्य संमेलनात बोलताना शाहीद रफी यांनी हे मत व्यक्त केलं आहे. सध्या देशात असलेली परिस्थिती व्यथित करणारी आहे. मुस्लिमांना या सरकारपासून धोका वाटत आहे. जेएनयूमध्ये घडलेली घटना असो अथवा अल्पसंख्यांकांवर झालेला हल्ला परिस्थिती चिंताजनक असल्यांच शाहीद रफी  बोलले आहेत.
 
शाहीद रफी यांनी गेल्याच महिन्यात काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. शाहीद रफी यांनी २०१४मध्ये एमआयएम पक्षातर्फे मुंबादेवी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. काँग्रेस धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही विचारांचा पक्ष असल्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं शाहीद रफी यांचं म्हणण आहे. 
 

Web Title: The accused of Mohammed Rafi's son is not safe in Modi's power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.