खूनप्रकरणातील आरोपींना १४ पर्यंत पोलीस कोठडी

By Admin | Published: March 11, 2016 10:26 PM2016-03-11T22:26:28+5:302016-03-11T22:26:28+5:30

जळगाव : चौघुले प्लॉट परिसरात घडलेल्या किशोर चौधरी खूनप्रकरणी अटकेत असणार्‍या सहा आरोपींना शुक्रवारी न्यायालयाने १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

The accused in the murder case up to 14 police constables | खूनप्रकरणातील आरोपींना १४ पर्यंत पोलीस कोठडी

खूनप्रकरणातील आरोपींना १४ पर्यंत पोलीस कोठडी

googlenewsNext
गाव : चौघुले प्लॉट परिसरात घडलेल्या किशोर चौधरी खूनप्रकरणी अटकेत असणार्‍या सहा आरोपींना शुक्रवारी न्यायालयाने १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
शनिपेठ पोलिसांनी या प्रकरणात रत्नाबाई सुरेश सोनवणे (३५), वैशाली रमेश कांडेलकर (२५), रंजनाबाई भगवान कोळी (२५), योगिता गणेश सपकाळे (२७), सखुबाई विश्वास सपकाळे (५०) सर्व रा.प्रजापतनगर, जळगाव व ज्ञानेश्वर भिवसन ताडे उर्फ नाना मराठे (३९, रा.आस्वारनगर, पिंप्राळा) यांना ११ मार्चला रात्री १२.३० वाजेच्या सुमारास अटक केली. त्यांना शुक्रवारी दुपारच्या सुमारास न्यायाधीश ए.डी. बोस यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. सरकार पक्षातर्फे ॲड.महेंद्र फुलपगारे यांनी युक्तिवादात, गुन्‘ातील प्रमुख सूत्रधार व फरार आरोपींचा शोध घ्यायचा असल्याने आरोपींना १४ पर्यंत पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. तर आरोपींतर्फे ॲड.राशीद पिंजारी व ॲड.पी.के. देशमुख यांनी युक्तिवादात, फिर्यादीनुसार आरोपी क्रमांक १ व २ यांनी टोचा हत्यार वापरले आहे. त्याच महिला आरोपींचा सहभाग स्पष्ट होत नाही. गुन्हा घडला; त्या वेळी महिला आरोपी घरी असल्याने त्यांना फरार आरोपींविषयी माहिती नसल्याने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याची गरज नसल्याचे सांगितले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्या.ए.डी. बोस यांनी सहाही आरोपींना १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: The accused in the murder case up to 14 police constables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.