Video - कोर्टात जाताना रस्त्यात पेट्रोल संपलं, आरोपींनीच मारला पोलिसांच्या गाडीला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 04:00 PM2024-02-06T16:00:02+5:302024-02-06T16:04:40+5:30
एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आरोपी चक्क पोलिसांच्या गाडीला धक्का देताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर दररोज व्हिडीओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आरोपी चक्क पोलिसांच्या गाडीला धक्का देताना दिसत आहेत. हा व्हिडीओ बिहारमधील असल्याचं सांगण्यात येत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक हैराण झाले आहेत आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
बिहारमध्ये दारूबंदी आहे. पोलीस दारू पिणाऱ्या लोकांना अटक करतात. बिहार सरकार दारूची तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी खूप पैसा खर्च करते. याशिवाय दारूची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांवरही योग्य ती कारवाई केली जाते. पण तरीही लोक ऐकत नाहीत आणि छुप्या पद्धतीने दारूचं सेवन करतात. बिहारमध्ये अशाच प्रकारे पकडलेल्या मद्यपींचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते पोलिसांच्या गाडीला धक्का देताना दिसत आहे.
पुलिस की गाड़ी और धक्का मारते क़ैदी।
— Anurag Chaddha (@AnuragChaddha) February 3, 2024
ये लिखने की ज़रूरत नहीं है कि दृश्य बिहार का है। 😀 #Bhagalpurpic.twitter.com/4GiJUY16JI
बिहारमधील भागलपूरचा हा व्हिडीओ आहे, जिथे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने मिळून काही मद्यपींना अटक केली आहे. मद्यपींना अटक केल्यानंतर पोलीस त्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात होते. याच दरम्यान, रस्त्यात पोलिसांच्या गाडीतील पेट्रोल संपलं आणि पोलिसांनी आरोपींना गाडीमधून खाली उतरून गाडी ढकलण्यास सांगितली.
व्हिडिओमध्ये 4 आरोपी गाडीला धक्का देत असल्याचं दिसत आहे. यानंतर बिहार पोलिसांवर बरीच टीका होत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये पोलिसांची गाडी आरोपी ढकलत आहेत असं म्हटलं आहे. आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला असून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.