भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदार सिंगवर लैंगिक छळाचा आरोप
By admin | Published: February 3, 2016 07:52 AM2016-02-03T07:52:49+5:302016-02-03T16:52:06+5:30
भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदार सिंग विरोधात एका ब्रिटीश महिलेने लैंगिक छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
लुधियाना. दि. ३ - भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदार सिंग विरोधात एका ब्रिटीश महिलेने लैंगिक छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. सरदार सिंगने आपला मानसिक, शारीरीक आणि भावनिक छळ केल्याचा आरोप पिडित महिलेने केला आहे. लग्नाचे आमिष दाखवून सरदार सिंगने आपला वापर केल्याचा आरोप पिडित तरुणीने केला आहे.
२०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिक दरम्यान या २१ वर्षीय पिडित तरुणीची सरदार सिंग बरोबर ओळख झाली होती. २०१५ मध्ये सरदार सिंगने आपल्याला जबरदस्तीने गर्भपात करायला लावल्याचा आरोपही या तरुणीने केला आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये आमची ओळख झाली. त्यानंतर आम्ही दोघे अधिक जवळ आलो. २०१५ मध्ये सरदारपासून मी गर्भवती राहिले. पण त्याला मूल नको होते. त्यामुळे माझ्या इच्छेविरुध्द जाऊन मला गर्भपात करावा लागला असे या पिडित तुरुणीने 'इंडियन एक्सप्रेस' दैनिकाशी बोलताना सांगितले.
लिखित तक्रार नोंदवली असली तरी, अजूनही एफआयआर दाखल केलेला नाही अशी माहिती लुधियानाचे पोलिस आयुक्त पी.सी.उमराननगल यांनी दिली. पीडित महिलेने केलेल्या आरोपांचा तपास करुन एफआयआर दाखल केला जाईल असे पोलिसांनी सांगितले.
सरदारने आधी लग्नाचे आश्वासन दिले होते नंतर मात्र त्याने नकार दिला. गर्भपात केल्यानंतर त्याने आपल्याकड़े दुर्लक्ष करुन आपल्याला सोडून दिले. सरदारने माझा मानसिक, शारीरीक आणि भावनिक छळ केला. सध्या हॉकी इंडिया लीगमध्ये सरदार पंजाब वॉरियर्सकडून खेळत आहे.