दगडफेक प्रकरणातील संशयितांची कारागृहात रवानगी

By admin | Published: July 8, 2016 06:17 PM2016-07-08T18:17:38+5:302016-07-08T18:17:38+5:30

जळगाव : गोलाणी मार्केटमध्ये दगडफेक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्‘ातील १२ संशयित आरोपींची शुक्रवारी न्यायालयाने जिल्हा कारागृहात रवानगी केली.

The accused in the stone-throwing case will be sent to jail | दगडफेक प्रकरणातील संशयितांची कारागृहात रवानगी

दगडफेक प्रकरणातील संशयितांची कारागृहात रवानगी

Next
गाव : गोलाणी मार्केटमध्ये दगडफेक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्‘ातील १२ संशयित आरोपींची शुक्रवारी न्यायालयाने जिल्हा कारागृहात रवानगी केली.
गोलाणी मार्केटमध्ये घुसून दगडफेक करीत दुकानांमधील साहित्यासह फलकांची नासधूस केल्याने संशयित आरोपी मोहंमद बिलाल मोहंमद फारूख बागवान, वसीम खान अब्दूल खान, इम्रान अब्दूल खान, मोहसीन शब्बीर बागवान, सैयद कलीम जवरअली, दानेश नासीर हुसेन, अमीर अली मोहंमद अली, मोहंमद जुबेर अब्दूल रहीम खाटीक, शेख जाकीर शेख शकील, ऐनोद्दीन अमिनोद्दीन शेख, सलमान सलीम खान व अल्तमश गुलाम रसूल खाटीक (सर्व रा.जळगाव) यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या सर्व संशयितांना न्यायालयाने अटी व शर्तीनुसार ६ व ७ जुलै या दोन दिवसांसाठी प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. ८ जुलैला हे सर्व संशयित न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

Web Title: The accused in the stone-throwing case will be sent to jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.