आचार्य बाळकृष्णजींचा जन्मोत्सव ‘जडीबुटी’ दिन; अनेक नवी पुस्तके, औषधांचे केले लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 08:52 AM2023-08-05T08:52:51+5:302023-08-05T08:53:41+5:30
आचार्य बाळकृष्णजी महाराजांच्या पुस्तकांचे प्रकाशन तसेच त्यांनी तयार केलेली नवीन औषधांचे लोकार्पण या कार्यक्रमात करण्यात आले.
हरिद्वार : वनौषधी पंडित या उपाधीने सन्मानित आयुर्वेद शिरोमणी आचार्य बाळकृष्णजी महाराज यांचा जन्मोत्सव हा पतंजली योगपीठ, पतंजली वेलनेस केंद्रातील योगभवन येथे ‘जडीबुटी दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. आचार्य बाळकृष्णजी महाराजांच्या पुस्तकांचे प्रकाशन तसेच त्यांनी तयार केलेली नवीन औषधांचे लोकार्पण या कार्यक्रमात करण्यात आले.
जन्मोत्सव कार्यक्रमाचा प्रारंभ यज्ञ व वैदिक मंत्रोच्चारांनी झाला. सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले स्वामीजी महाराज यांनी फोनवरून संपर्क साधून आचार्य बाळकृष्णजी यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वामीजी महाराज म्हणाले की, आचार्य बाळकृष्णजी प्रतिभावंत आहेत. त्यांनी शिक्षण, आयुर्वेद, संशोधन, लेखन, समाजसेवा, शेती आदी अनेक क्षेत्रांत अभूतपूर्व कार्य केले आहे. (वा.प्र)
निसर्गाविषयी प्रेम...
पतंजली ग्रामोद्योगचे महामंत्री यशदेव शास्त्री म्हणाले की, निसर्गाविषयी आचार्य बाळकृष्णजी यांच्या मनात नितांत प्रेम व आदर आहे. त्यामुळेच त्यांचा जन्मोत्सव हा जडीबुटी दिन म्हणून साजरा करण्यात आला.