फाशीची शिक्षा झालेल्या दोषीची निर्दोष सुटका; नाहक गोवल्याचे स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 06:52 AM2023-05-21T06:52:49+5:302023-05-21T06:53:12+5:30

अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर हत्या

acquittal of convicts sentenced to death; It is clear that there is no doubt, Supreme court verdict | फाशीची शिक्षा झालेल्या दोषीची निर्दोष सुटका; नाहक गोवल्याचे स्पष्ट

फाशीची शिक्षा झालेल्या दोषीची निर्दोष सुटका; नाहक गोवल्याचे स्पष्ट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : सहा वर्षीय मुलीवरील बलात्कार व हत्येप्रकरणी दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठाविलेल्या व्यक्तीची तब्बल १३ वर्षांनी सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष सुटका केली. पोलिसांनी या प्रकरणात त्याला नाहक गोवल्याचे निदर्शनास आल्यावर सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

११ जून २०१० रोजी भाईंदर येथे एका चाळीत राहणाऱ्या सहा वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशहून रोजगाराच्या शोधात आलेल्या प्रकाश निषाद याला पोलिसांनी अटक केली. सत्र न्यायालयाने त्याला बलात्कार, हत्या आणि पुरावे नष्ट केल्याच्या गुन्ह्याखाली फाशीची शिक्षा ठोठावली आणि मुंबई उच्च न्यायालयाने त्याची शिक्षा कायम केली. निषाद याने या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. ज्येष्ठ विधिज्ञ बी. एच. मार्लापल्ले यांनी निषाद याची बाजू न्यायालयापुढे मांडली.

पीडित मुलगी आणि निषाद एकाच चाळीत राहात होते. निषाद उत्तर प्रदेशहून आल्याने व तो कामासाठी सकाळी घर सोडत असे ते थेट रात्री घरी येत असल्याने त्याचा चाळीत कोणाशीची संबंध नव्हता. तो केवळ रात्रीचा जेवणाचा डबा पीडितेच्या आईकडून घेत असे. त्यावेळी दोघे २. थोडेफार संवाद साधत. जून २०२१ मध्ये पीडिता गायब झाली व दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह घराशेजारील त्याशिवाय आरोपीचे रक्त मराठीत सही कशी? सर्व प्रकरणात नाहक नाल्यात सापडला. पोलिसांनी नमुने घेण्यासाठी कोणी तसेच त्याला त्याने गोवण्यात आल्याचे निषादच्या घराची झडती घेतली. त्याच्या अंतर्वस्त्रांवर रक्ताचे डाग व वीर्य सापडल्याने पोलिसांनी त्याला नव्हता? त्याच्या अटक केली. अल्पवयीन मुलीवर बलात्कार, तिची हत्या आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने निषादची निर्दोष सुटका करताना पोलिस तपासातील अनेक त्रुटी दाखवल्या.

सुप्रीम कोर्टाने पोलिसांना विचारले प्रश्न
मुळात निषादकडे संशयित म्हणून का पाहण्यात आले? त्याचे समाधानकारक उत्तर सरकारी वकील देऊ शकले नाहीत. निषाद राहत असलेल्या खोलीची झडती घेताना पोलिसांना काही पुरावा का सापडला नाही?

खोलीचा कानाकोपरा
निषादचे जबरदस्तीने रक्त काढून तेच त्याच्या अंतर्वस्त्रांना पोलिसांनीच केला आहे. कागदपत्रांवर त्याची लावण्यात आले. त्याला या
तपासल्याचा दावा वैद्यकीय अधिकारी किंवा पॅरामेडिकल कर्मचारी का आहे, हे मराठीत रक्ताच्या नमुन्याची चाचणी करण्यासाठी इतका विलंब का लागला? आरोपीला अटक केल्यानंतर एक पोलिसांच्या महिन्याने आरोपीच्या घेण्यात आला?
त्याशिवाय निषादला मराठी येत नसताना काय गुन्हा केला समजावून का सांगण्यात आले?, असे प्रश्न उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयाने

तपासावर प्रश्न
अपिलात म्हटले आहे. खरा आरोपी अजूनही शिक्षा न भोगता मोकाट आहे. पोलिसांनी अधिक सावधगिरीने तपास करत रक्ताचा नमुना का निर्माण केला. तथ्य व सत्य शोधले पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Web Title: acquittal of convicts sentenced to death; It is clear that there is no doubt, Supreme court verdict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.