शहांची निर्दोष सुटका चिंताजनक

By admin | Published: December 30, 2014 11:47 PM2014-12-30T23:47:46+5:302014-12-30T23:47:46+5:30

भाजपाध्यक्ष अमित शहा यांची निर्दोष सुटका ‘आश्चर्यकारक आणि चिंताजनक’ असल्याचे काँग्रेसने म्हटले असून याप्रकरणी सीबीआयच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे़

The acquittals of the accused are alarming | शहांची निर्दोष सुटका चिंताजनक

शहांची निर्दोष सुटका चिंताजनक

Next

काँग्रेस : सीबीआयच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, ‘आप’चाही हल्ला
नवी दिल्ली : सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकीप्रकरणी भाजपाध्यक्ष अमित शहा यांची निर्दोष सुटका ‘आश्चर्यकारक आणि चिंताजनक’ असल्याचे काँग्रेसने म्हटले असून याप्रकरणी सीबीआयच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे़ सीबीआय सरकारच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे़
काँग्रेस प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी यानिमित्ताने मंगळवारी सरकारवर टीका केली़ अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत़ मॅजिस्ट्रेटसमक्ष कलम १६४ (सीआरपीसी) अंतर्गत दिलेला जबाब, मुंबईच्या न्यायालयात १५ मिनिटांच्या युक्तिवादात सीबीआय वकिलाने यापैकी कशाचाही उल्लेख केला नाही, असे सिंघवी म्हणाले़ बचाव पक्षाच्या वकिलाने शहांच्या बाजूने तीन दिवस युक्तिवाद केला असताना सीबीआयने केवळ १५ मिनिटे युक्तिवाद का करावा़ सीबीआयने याप्रकरणी विशेष सरकारी वकिलाची मदत का घेतली नाही? असे प्रश्न त्यांनी टिष्ट्वटरवर उपस्थित केले़ याप्रकरणी सीबीआयने दाखल केलेले आरोपपत्र व न्यायालयासमक्ष केलेला युक्तिवाद यात मोठी तफावत होती, असे आम आदमी पार्टीचे नेते योगेन्द्र यादव यांनी म्हटले आहे.
‘आमच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब’
बनावट चकमकीप्रकरणी विशेष न्यायालयाने भाजपाध्यक्ष अमित शहा यांची निर्दोष सुटका केल्याची बातमी ऐकून मला आनंद झाला़ आमच्या पक्षाची याबाबतची भूमिका खरी असल्याचे न्यायालयीन निर्णयाने सिद्ध झाले, अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी दिली़
(लोकमत न्यूज नेटवर्क)

नवी दिल्ली : सोहराबुद्दीन बनावट चकमकीप्रकरणी भाजपाध्यक्ष अमित शहा यांची निर्दोष सुटका करण्याच्या विशेष न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास केल्यानंतरच याविरोधात अपिलात जाण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे सीबीआयने स्पष्ट मंगळवारी केले़

Web Title: The acquittals of the accused are alarming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.