डीपफेक रोखण्यासाठी कायदा; संसद अधिवेशनात विधेयक मांडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 08:48 AM2023-11-20T08:48:14+5:302023-11-20T08:49:04+5:30

संसद अधिवेशनात विधेयक मांडणार

Act to Prevent Deepfake; The bill will be introduced in the Parliament session | डीपफेक रोखण्यासाठी कायदा; संसद अधिवेशनात विधेयक मांडणार

डीपफेक रोखण्यासाठी कायदा; संसद अधिवेशनात विधेयक मांडणार

संजय शर्मा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केल्यानंतर डीपफेक रोखण्यासाठी केंद्र सरकार संसदेच्या याच हिवाळी अधिवेशनात कायदा आणणार आहे. 

केंद्र सरकार डीपफेक रोखण्यासाठी सर्व पक्षांशी चर्चा करणार असल्याचे केंद्रीय दळणवळण आणि आयटीमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. डीपफेकचा दुरुपयोग रोखण्यासाठी कडक कायदा व कठोर शिक्षेची तरतूद करण्याची तयारी सुरू आहे. दुसरीकडे केंद्रीय कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल हे डीपफेकबाबत सर्व कायदेशीर सल्ला मसलत करीत आहेत. चार डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकार डीपफेक रोखण्यासाठी विधेयक आणणार असल्याचे सांगण्यात आले.

काय आहे डीपफेक?

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (एआय) या डीपफेकद्वारे कोणाचाही व्हिडीओ अथवा छायाचित्र, त्याच्यासारखाच चेहरा व आवाज तयार करण्यात येतो. याचा दुरुपयोग होण्याची पुरेपूर शक्यता आहे.

Web Title: Act to Prevent Deepfake; The bill will be introduced in the Parliament session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.