अवैध वाळूचा उपसा चार ट्रॅक्टरच्या मालकांवर कारवाई

By admin | Published: November 3, 2015 11:46 PM2015-11-03T23:46:04+5:302015-11-03T23:46:04+5:30

जळगाव : शहरातील खेडी, गिरणा पंपिंग, सावखेडा, रामानंद परिसरात सोमवारी रात्री दहा ते एक वाजेच्या दरम्यान तहसीलदार गोविंद शिंदे यांच्यासह त्यांच्या पथकातील अधिकार्‍यांनी धाड टाकली. याप्रसंगी अधिकार्‍यांना अवैध वाळूचा उपसा करणार्‍या चार ट्रॅक्टर दिसून आल्या. त्यामुळे अधिकार्‍यांनी ट्रॅक्टर जप्त करून संबंधित ट्रॅक्टरच्या मालकांकडून प्रत्येकी १५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

Acting on illegal sand extraction four tractor owners | अवैध वाळूचा उपसा चार ट्रॅक्टरच्या मालकांवर कारवाई

अवैध वाळूचा उपसा चार ट्रॅक्टरच्या मालकांवर कारवाई

Next
गाव : शहरातील खेडी, गिरणा पंपिंग, सावखेडा, रामानंद परिसरात सोमवारी रात्री दहा ते एक वाजेच्या दरम्यान तहसीलदार गोविंद शिंदे यांच्यासह त्यांच्या पथकातील अधिकार्‍यांनी धाड टाकली. याप्रसंगी अधिकार्‍यांना अवैध वाळूचा उपसा करणार्‍या चार ट्रॅक्टर दिसून आल्या. त्यामुळे अधिकार्‍यांनी ट्रॅक्टर जप्त करून संबंधित ट्रॅक्टरच्या मालकांकडून प्रत्येकी १५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
सप्टेंबर अखेरीस वाळूच्या ठेक्याची मुदत संपली आहे. तरीही वाळू माफिया वाळूचा उपसा करण्याचे सत्र थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. त्यापार्श्वभूमीवर अवैध वाळूचा उपसा रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे तालुकानिहाय पथक स्थापन करण्यात आले आहे. वाळूची तस्करी नेमक्या कोणत्या वेळेला चालते? याची नोंद घेऊन पथकातील अधिकारी संबंधित ठिकाणी धाड टाकून कारवाईचे काम करत आहे.
तीन तास चालली कारवाई
तहसीलदार गोविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार एम. ई. माळी, डी एस. भालेराव, तलाठी वनराज पाटील, म्हसावदचे मंडळ अधिकारी राहुल नाईक यांनी सोमवारी खेडी, गिरणा पंपिंग, सावखेडा व रामानंद परिसरात रात्री दहा ते एक यावेळेत पाहणी केली. त्यात अवैध वाळू उपसा होत असल्याचे दिसून आल्यानंतर या पथकाने संबंधित ठिकाणाहून चार ट्रॅक्टर जप्त केल्या आहेत.
प्रांताधिकार्‍यांकडे अहवाल
तहसीलदार शिंदे यांच्या पथकाने जी कारवाई वाळू माफियांवर केली आहे. त्याचा अहवाल प्रांत अधिकार्‍यांकडे पाठविला असून पुढे हा अहवाल उपविभागीय अधिकार्‍यांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर होणार्‍या सुनावणीनंतर जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर परत करायचे का? यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.

जप्त करण्यात आलेल्या चारही ट्रॅक्टरच्या मालकांची नावे अशी : (सर्व राहणार जळगाव)
० अनिल अशोक सोनवणे :एम.एच.१९ ए.एम.९३३३
० दिनेश रवींद्र अत्तरदे : एम. एच. १९ ए. एन. ४०६३
० गिरधारी कन्हैयाला कालराणी :एम. एच. १९ ए.एन.१९४६
० प्रभाकर नामदेव सोनवणे :एम. एच. १९ ए. पी. ९२७७

Web Title: Acting on illegal sand extraction four tractor owners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.