ITची 400 अघोषित व्यवहारांवर कारवाई, 600 कोटींची मालमत्ता उघड

By admin | Published: May 24, 2017 07:43 PM2017-05-24T19:43:58+5:302017-05-24T19:43:58+5:30

प्राप्तिकर विभागानं 240 प्रकरणांत तब्बल 400हून अधिक अघोषित व्यवहारांचा पर्दाफाश केला आहे.

Action on 400 unauthorized transactions of IT, disclosure of assets worth 600 crores | ITची 400 अघोषित व्यवहारांवर कारवाई, 600 कोटींची मालमत्ता उघड

ITची 400 अघोषित व्यवहारांवर कारवाई, 600 कोटींची मालमत्ता उघड

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - प्राप्तिकर विभागानं 240 प्रकरणांत तब्बल 400हून अधिक अघोषित व्यवहारांचा पर्दाफाश केला आहे. 600 कोटी रुपयांच्या मालमत्तेशी या व्यवहारांचा संबंध असल्याचा शोधही प्राप्तिकर विभागानं लावला आहे. प्राप्तिकर विभाग नवा बेनामी कायदा बनवण्याच्या तयारीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्राप्तिकर विभागानं हे धाडसत्र सुरू केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी 42 अघोषित मालमत्ता उघड झाल्या असून, बेनामी मालमत्तांप्रकरणी 42 जणांना नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या.
 
नव्याने मंजुरी मिळालेल्या बेनामी मालमत्ताविरोधी कायद्यानुसार अशी संपत्ती बाळगणाऱ्यांविरोधात जबर आर्थिक दंड आणि सात वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर दुसऱ्यांचा बेहिशेबी पैसा आपल्या खात्यावर जमा करू नका, असे आवाहन  प्राप्तिकर विभागाकडून सर्वसामान्य नागरिकांना करण्यात आले होते. तसेच असे केल्यास  फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा इशाराही देण्यात येत होता.
 
दरम्यान, नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रकमेचा भरणा झाला होता. अशा मोठ्या प्रमाणात रोख रक्कम भरणा झालेल्या खात्यांचा छडा प्राप्तिकर विभागाने लावला होता. त्यातील 87 जणांना प्राप्तिकर कायद्यातील कलम 24 अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. तसेच 42 अघोषित मालमत्ताधारक उघड झाले आहेत, अशी माहिती प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. 
 

Web Title: Action on 400 unauthorized transactions of IT, disclosure of assets worth 600 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.