काळ्या पैशाविरोधात ईडीची देशभरात धडक कारवाई

By admin | Published: April 1, 2017 03:09 PM2017-04-01T15:09:19+5:302017-04-01T17:37:17+5:30

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देशभरात बनावट कंपन्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाई अंतर्गत ईडीनं देशातील 100 ठिकाणी छापेमारी केली आहे.

Action against black money in the country | काळ्या पैशाविरोधात ईडीची देशभरात धडक कारवाई

काळ्या पैशाविरोधात ईडीची देशभरात धडक कारवाई

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 -  अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देशभरात बनावट कंपन्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे.  या कारवाई अंतर्गत ईडीनं देशातील 100 ठिकाणी छापेमारी केली आहे. यात 300 पेक्षा जास्त बनावट कंपन्या सापडल्या आहेत. या कंपन्यांना नोटाबंदीदरम्यान काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. शिवाय या कंपन्यांचा मनी लाँड्रिंगमध्येही सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
ईडीने दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरु, भुवनेश्वर, कोलकाता आणि इतर दुसऱ्या मेट्रो शहरांमध्ये छापे टाकले. या कारवाईत अधिकाऱ्यांनी बनावट कंपन्यांचे रेकॉर्ड तपासले आहे. तपासणीदरम्यान त्यांच्यावर बेकायदेशीर व्यवहार केल्याचा आरोप असल्याचं आढळून आलं. 
 
काळा पैसा घोषित करण्यासाठी केंद्र सरकारने 31 मार्चपर्यंतची मुदत दिली होती. ही मुदत संपताच ईडीने देशभरात कारवाई सुरू केली आहे. मनी लाँड्रींग कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात सुरू आहे. नोटाबंदीमुळे पैसा गुंतवण्याच्या नावाखाली अनेक बोगस कंपन्या स्थापन करण्यात आल्या. इतकंच नाही तर या बोगस कंपन्यांमार्फत परदेशात मोठ्या प्रमाणात पैसा पाठवला गेला, असाही ईडीला संशय आहे.

Web Title: Action against black money in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.