मास्क न वापरणाऱ्यांवरकारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 09:51 PM2020-09-18T21:51:11+5:302020-09-19T01:24:29+5:30
सटाणा : शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून गर्दीच्या ठिकाणी नागरिक काळजी घेत नसल्याचे निदशर्नास येत आहे . त्यामुळे शहरात आता मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे .
सटाणा : शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून गर्दीच्या ठिकाणी नागरिक काळजी घेत नसल्याचे निदशर्नास येत आहे . त्यामुळे शहरात आता मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे . विनामास्क फिरणा?्यांवर कारवाई दुकानदारांनीही शारीरिक अंतर ठेवून हँडग्लोज , सॅनिटायझर व मास्क बंधनकारक केले आहे . जे नागरिक व दुकानदार नियमांचे पालन करणार नाही , त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल केले जातील , अशी माहिती मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी दिली . त्या म्हणाल्या , की बागलाण तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला असून , सटाणा शहरातही दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची वाढत असलेली संख्या चिंताजनक आहे . या पाश्वर्भूमीवर पालिका प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत .मास्क नाही , तर माफी नाही ; दंड भरावाच लागणार शहरात शासनाच्या निर्देशानुसार ' माझे कुटुंब - माझी जबाबदारी ' ही मोहीम हाती घेण्यात आली असून , मोहिमेच्या यशस्वितेसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे . कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरात मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले असून , मास्क न वापरणा?्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे . दुकानात किंवा दुकानाबाहेर अनावश्यक गर्दी आढळून आल्यास दुकानदाराविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील .
माझे कुटुंब, माझी जबाबदारी
माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत घरोघरी सर्वेक्षणास येणाºया सर्वेक्षकास आवश्यक माहिती देण्यास टाळाटाळ करणाºया व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल . ज्या व्यक्तींना कोरोनासदृश लक्षणे आढळून येत असतील , अशा नागरिकांनी तत्काळ ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधावा अथवा सर्वेक्षकास माहिती द्यावी . त्यामुळे संबंधित व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांची योग्य काळजी घेऊन त्यांच्यावर वेळीच उपचार केले जातील . नागरिकांनी या मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहनही डगळे यांनी केले .