अनधिकृत बांधकामांवरही हातोडा नागरिकांचा विरोध : अतिक्रमण विभागातर्फे दोन पथकांद्वारे कारवाई
By admin | Published: February 19, 2016 12:23 AM2016-02-19T00:23:37+5:302016-02-19T00:23:37+5:30
सोबतफोटो-४५जळगाव : मनपा अतिक्रमण विभागातर्फे गुरूवारी संभाजीनगर स्टॉपजवळील घराच्या साईडमार्जीनमध्ये केलेले जिन्याचे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी गेलेल्या पथकाला नागरिकांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. मात्र विरोधाला न जुमानता ते अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. त्यानंतर सानेगुरूजी उद्यानामागील आऊटहाऊसचे अनधिकृत बांधकामही तोडण्यात आले. दरम्यान क्रेझी होमचे अनधिकृत बांधकाम तोडण्याचे कामही गुरूवारीही सुरूच होते.
Next
स बतफोटो-४५जळगाव : मनपा अतिक्रमण विभागातर्फे गुरूवारी संभाजीनगर स्टॉपजवळील घराच्या साईडमार्जीनमध्ये केलेले जिन्याचे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी गेलेल्या पथकाला नागरिकांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. मात्र विरोधाला न जुमानता ते अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. त्यानंतर सानेगुरूजी उद्यानामागील आऊटहाऊसचे अनधिकृत बांधकामही तोडण्यात आले. दरम्यान क्रेझी होमचे अनधिकृत बांधकाम तोडण्याचे कामही गुरूवारीही सुरूच होते. क्रेझीहोमवर दुसर्या दिवशीही कारवाईमहामार्गालगत असलेल्या क्रेझीहोमच्या अनधिकृत बांधकामावर बुधवारी कारवाईस सुरूवात करण्यात आली होती. कॉर्नरला बांधलेल्या संरक्षण भिंतीचे अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरूवात करण्यात आली होती. गुरूवारी ते बांधकाम तोडण्यात आले. तसेच स्टेजचे अनधिकृत बांधकाम, मार्जीन स्पेसमधील टॉयलेट, किचनचे शेड, पार्कीर्ंग स्पेसमधील डायनिंग हॉलचे बांधकाम तोडण्यात आले. जिन्याचे बांधकाम तोडलेसंभाजीनगर स्टॉपजवळील वत्सला गौतम सोनवणे यांच्या घराच्या मार्जीनस्पेसमध्ये अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट जिन्याबाबत शेजार्याने तक्रार केलेली होती. त्याची नगररचनाकडे सुनावणी होऊन सकारण आदेश अतिक्रमण विभागाला देण्यात आले होते. त्यानुसार अतिक्रमण विभागाचे पथक तेथे कारवाईसाठी गुरूवारी दुपारी पोहोचले. मात्र रहिवाशांनी विरोध केला. विरोध मोडून काढत हे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. आऊटहाऊसचे बांधकामही तोडलेसानेगुरूजी उद्यानाच्या पाठीमागील एम.एम. कुलकर्णी यांच्या घराच्या मार्जीनस्पेसमध्ये असलेले आऊटहाऊसचे १५ बाय २० फुटांचे अनधिकृत बांधकामही मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने तोडण्याची कारवाई केली. याबाबत २०१३ मध्येच सकारण आदेश देण्यात आलेले होते.---- इन्फो---सर्व सकारण आदेशांवर कार्यवाहीअनधिकृत बांधकाम अथवा अतिक्रमणाबाबतच्या तक्रारींवर नगररचना सहाय्यक संचालकांकडे झालेल्या तक्रारींवर सुनावणी घेऊन कारवाईसाठी दिलेले सकारण आदेश अतिक्रमण विभागाकडे कारवाईसाठी प्रलंबित आहेत. त्या सर्व आदेशांवर कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार अतिक्रमण विभागाने गुरूवारी क्रेझीहोमसह आणखी दोन ठिकाणी कारवाई केली.