खडसेंच्या अभिनंदनाच्या ठरावावरून जि.प.त खडाजंगी मनपातही आयुक्तांवर कारवाईचा ठराव
By admin | Published: June 14, 2016 11:34 PM2016-06-14T23:34:44+5:302016-06-14T23:34:44+5:30
जळगाव : माजी कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांचे कपाशी व इतर बियाण्यांचे दर निम्मे कमी केल्यावरून त्यांचे अभिनंदन करण्याच्या ठरावाच्या मुद्द्यावरून मंगळवारी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत चांगलीच खडाजंगी झाली. बियाण्यांचे दर निम्मे कमीच झालेलेे नसल्याचे सांगत विरोधकांनी या ठरावात सुधारणा करण्याची मागणी केली. तर सत्ताधार्यांनी हा विषय बहुमताच्या बळावर पुढे रेटला. तर महापालिकेच्या महासभेतही वसुलीच्या मुद्यावरुन मनपा आयुक्तांवर रोष व्यक्त करीत त्यांच्या कारवाईच्या शिफारसीचा ठराव करण्यात आला.
Next
ज गाव : माजी कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांचे कपाशी व इतर बियाण्यांचे दर निम्मे कमी केल्यावरून त्यांचे अभिनंदन करण्याच्या ठरावाच्या मुद्द्यावरून मंगळवारी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत चांगलीच खडाजंगी झाली. बियाण्यांचे दर निम्मे कमीच झालेलेे नसल्याचे सांगत विरोधकांनी या ठरावात सुधारणा करण्याची मागणी केली. तर सत्ताधार्यांनी हा विषय बहुमताच्या बळावर पुढे रेटला. तर महापालिकेच्या महासभेतही वसुलीच्या मुद्यावरुन मनपा आयुक्तांवर रोष व्यक्त करीत त्यांच्या कारवाईच्या शिफारसीचा ठराव करण्यात आला. मनपा आयुक्तांसह अधिकार्यांवर कारवाईच्या शिफारसीचा ठरावशासनाकडे चार मार्केटच्या केवळ मालकीहक्काचा विषय असताना व थकीत भाडे वसुली व गाळे ताब्यात घेण्यासंदर्भात शासन अथवा न्यायालयाची कुठलीही स्थगिती नसतानाही थकबाकी वसुलीची कारवाई करण्याचे मनपा आयुक्त व संबंधीत अधिकार्यांनी हेतुपुरस्करपणे टाळले. त्यामुळे मनपाचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून नागरिकांना सुविधांपासून वंचित रहावे लागले. याबाबत आयुक्तांसह दोषी अधिकार्यांवर जबाबदारी निश्चित करून वसुली करावी तसेच कारवाई करावी, अशी शिफारस करणारा ठराव मंगळवारी मनपाच्या महासभेत एकमताने करण्यात आला.