BSF च्या कारवाईत चार पाकिस्तानी पोस्ट उद्धवस्त
By admin | Published: October 29, 2016 10:29 PM2016-10-29T22:29:36+5:302016-10-29T22:48:06+5:30
जम्मू-काश्मिरच्या केरान सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबाराला भारतीय लष्कराने शनिवारी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. २९ - जम्मू-काश्मिरच्या केरान सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबाराला भारतीय लष्कराने शनिवारी चोख प्रत्युत्तर दिले आहे. केरान सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होताच प्रत्युत्तरादाखल सीमा सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या चार चौक्या उद्धवस्त झाल्या आहेत.
या गोळीबारात पाकिस्तानी सैन्याचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. पाकिस्तानच्या कुठल्याही आगळीकीला त्याच भाषेत उत्तर दिले जाईल हे आधीच लष्कराने स्पष्ट केले आहे. त्यानुसार बीएसएफने कारवाई केली. आठवडयाभरापासून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे पण मागच्या दोन दिवसात पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरील बीएसएफ पोस्टवर मोठया प्रमाणात गोळीबार केला. यात भारताचे दोन जवानही शहीद झाले. भारताच्या कारवाईतही १५ पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते.
आज माचिल सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात एक जवान शहीद झाला. शुक्रवारी एका भारतीय जवानाला मारल्यानंतर त्याचे अवयव दहशतवाद्यांनी कापले होते. या नापाक कृत्याला त्याच भाषेत उत्तर दिले जाईल हे लष्कराने स्पष्ट केले आहे. आतापर्यंत पाकिस्तानच्या गोळीबारात लष्कराचे चार आणि बीएसएफचे तीन जवान शहीद झाले आहेत.
Four Pak posts destroyed in massive fire assault in Keran Sector (J&K), heavy casualties inflicted: Army
— ANI (@ANI_news) October 29, 2016