आरटीओ एजंटांमध्ये हाणामारी

By admin | Published: April 29, 2016 12:29 AM2016-04-29T00:29:37+5:302016-04-29T00:29:37+5:30

जळगाव : लायसन्सबाबत तक्रार केल्याच्या कारणावरुन गणेश कौतिकराव ढेंगे (वय ५३ रा.स्टेट बॅँक कॉलनी) व मयूर श्याम जोशी (रा.पहुर) या दोन आरटीओ एजंटमध्ये गुरुवारी सकाळी सिध्देश्वर नगरात वाद झाला. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. यात जोशी व त्याच्या दोन मित्रांनी क्रिकेट खेळण्याच्या स्टम्पने मारहाण केल्याचा आरोप ढेंगे यांनी केला आहे. मारहाण करुन तिघे जण तेथून पळून गेले. ढेंगे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ढेंगे व जोशी या दोघांमध्ये यापूर्वीही बर्‍याच वेळा वाद होऊन पोलीस स्टेशनपर्यंत तक्रारी झाल्या आहेत. आता जोशी याने जामनेरच्या कॅम्पमध्ये काही जणांचे लायसन्स काढून दिले.ज्यांच्या रजिस्टरमध्ये नोंदी असतील त्यावरच स‘ा कराव्यात अशी तक्रार ढेंगे यांनी अधिकार्‍यांकडे केल्याने त्याचा राग आल्याने हा वाद झाल्याचे सांगण्यात आले.

Action in RTO Agents | आरटीओ एजंटांमध्ये हाणामारी

आरटीओ एजंटांमध्ये हाणामारी

Next
गाव : लायसन्सबाबत तक्रार केल्याच्या कारणावरुन गणेश कौतिकराव ढेंगे (वय ५३ रा.स्टेट बॅँक कॉलनी) व मयूर श्याम जोशी (रा.पहुर) या दोन आरटीओ एजंटमध्ये गुरुवारी सकाळी सिध्देश्वर नगरात वाद झाला. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. यात जोशी व त्याच्या दोन मित्रांनी क्रिकेट खेळण्याच्या स्टम्पने मारहाण केल्याचा आरोप ढेंगे यांनी केला आहे. मारहाण करुन तिघे जण तेथून पळून गेले. ढेंगे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ढेंगे व जोशी या दोघांमध्ये यापूर्वीही बर्‍याच वेळा वाद होऊन पोलीस स्टेशनपर्यंत तक्रारी झाल्या आहेत. आता जोशी याने जामनेरच्या कॅम्पमध्ये काही जणांचे लायसन्स काढून दिले.ज्यांच्या रजिस्टरमध्ये नोंदी असतील त्यावरच स‘ा कराव्यात अशी तक्रार ढेंगे यांनी अधिकार्‍यांकडे केल्याने त्याचा राग आल्याने हा वाद झाल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Action in RTO Agents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.