आरटीओकडून सात हजार वाहनांवर कारवाई ६३ कोटीचा महसूल : नऊ महिन्यात सात हजार वाहनांची भर

By admin | Published: January 12, 2016 11:16 PM2016-01-12T23:16:07+5:302016-01-12T23:16:07+5:30

जळगाव: वाहतूक व परिवहन नियमांचे उल्लंघन केलेल्या सहा हजार ९०४ वाहनांवर आरटीओच्या भरारी पथकाने कारवाई केली आहे. यात अवैध प्रवाशी वाहतूक करणार्‍या ४२३, ओव्हरलोडच्या एक हजार ३८८ वाहनांचा समावेश आहे. २९४ वाहनांची नोंदणी तर एक हजार २४२ वाहनांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. दरम्यान, वाहन नोंदणी, भरारी पथक व अन्य मार्गातून नऊ महिन्यात तब्बल ६३ कोटी ३१ लाख रुपयांचा महसुल विभागाला मिळाला आहे.

Action on seven thousand vehicles from RTO: Rs 63 crore Revenue: 7 thousand vehicles in nine months | आरटीओकडून सात हजार वाहनांवर कारवाई ६३ कोटीचा महसूल : नऊ महिन्यात सात हजार वाहनांची भर

आरटीओकडून सात हजार वाहनांवर कारवाई ६३ कोटीचा महसूल : नऊ महिन्यात सात हजार वाहनांची भर

Next
गाव: वाहतूक व परिवहन नियमांचे उल्लंघन केलेल्या सहा हजार ९०४ वाहनांवर आरटीओच्या भरारी पथकाने कारवाई केली आहे. यात अवैध प्रवाशी वाहतूक करणार्‍या ४२३, ओव्हरलोडच्या एक हजार ३८८ वाहनांचा समावेश आहे. २९४ वाहनांची नोंदणी तर एक हजार २४२ वाहनांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. दरम्यान, वाहन नोंदणी, भरारी पथक व अन्य मार्गातून नऊ महिन्यात तब्बल ६३ कोटी ३१ लाख रुपयांचा महसुल विभागाला मिळाला आहे.
एक एप्रिल ते ३१ डिसेंबर २०१५ या नऊ महिन्यात सात हजार ३९२ वाहनांची नवीन भर पडली असून त्याची नोंदणी झाली आहे. त्यातून ४९ कोटी ४० लाख रुपये मिळाले आहेत. यात सर्वाधिक सहा हजार ७१० दुचाकी असून २०२ कार व अन्य वाहनांचा समावेश आहे. भरारी पथकाने राबविलेल्या मोहिमेत पाच कोटी १२ लाख रुपयांचा दंड वाहनधारकांकडून वसूल करण्यात आला आहे.
चेकपोस्टवर साडे सहा कोटी वसूल
जिल्‘ात चोरवड व कर्की येथे आरटीओचे स्वतंत्र सीमा तपासणी नाके कार्यान्वित आहेत. परराज्यातून येणार्‍या प्रत्येक वाहनाची येथे तपासणी करण्यात येते. अवैध प्रवाशी, ओव्हरलोड, विना क्रमांक अशा वाहनांवर केलेल्या कारवाईतून चोरवड नाक्यावर एक कोटी १९ लाख ३६ हजार ४०८ तर कर्की नाक्यावर पाच कोटी ४८ लाख ३१ हजार ८५४ रुपये दंडाच्या स्वरुपात वसूल करण्यात आले आहेत.
वाळू तस्करांकडून ३५ लाख वसूल
चोरटी तसेच क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहून नेणे तसेच वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांचा परवाना नसणे अशा शहरात १४१ वाहनांवर आरटीओच्या पथकाने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ३४ लाख ९५ हजार ४५० रुपये वसूल करण्यात आले आहेत. अन्य किरकोळ कराच्या पोटी एक कोटी रुपयांचा महसूल या विभागाला जास्तीचा मिळाला आहे.

Web Title: Action on seven thousand vehicles from RTO: Rs 63 crore Revenue: 7 thousand vehicles in nine months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.