हेरगिरी करणा-या पाक अधिका-यावर कारवाई, नंतर सुटका

By admin | Published: October 27, 2016 11:06 AM2016-10-27T11:06:20+5:302016-10-27T14:21:04+5:30

दिल्ली पोलिसांनी हेरगिरीच्या आरोपाखाली ताब्यात घेतलेल्या पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिका-याची सुटका केली असून त्याला तातडीने भारत सोडून जायला सांगितले आहे.

Action on the spying govt, then rescued | हेरगिरी करणा-या पाक अधिका-यावर कारवाई, नंतर सुटका

हेरगिरी करणा-या पाक अधिका-यावर कारवाई, नंतर सुटका

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - दिल्ली पोलिसांनी हेरगिरीच्या आरोपाखाली ताब्यात घेतलेल्या पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिका-याची सुटका केली असून त्याला  तातडीने भारत सोडून जायला सांगितले आहे. मोहम्मद अख्तर असे या पाकिस्तानी अधिका-याचे नाव असून त्याचे वय जवळपास 35 वर्षे असल्याचे म्हटले जात आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, या पाकिस्तानी अधिका-याकडे भारतीय लष्करासंबंधीची गोपनीय कागदपत्रं सापडली. या घटनेनंतर परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना समन्स बजावला आहे. तसेच याप्रकरणी दोन भारतीय नागरिकांनाही अटक करण्यात आली आहे. 
 
सुरक्षा यंत्रणा गेल्या काही दिवसांपासून या पाकिस्तानी अधिका-यावर नजर ठेवून होती. पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील एका व्यक्तीकडे भारतीय लष्कराबाबत गोपनीय माहिती असल्याचे गुप्तचर विभागाने क्राईम ब्रांचला सांगितले होते. माहिती मिळाल्यानंतर संशय असलेल्या मोहम्मद अख्तरच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवून क्राईम ब्रांचचने आज ही कारवाई केली आहे. 
मोहम्मद अख्तर हा पाकिस्तानातील गुप्तचर संस्थेतील अधिका-यांच्या संपर्कात असल्याचीही माहिती समोर येत आहे. दरम्यान, क्राईम ब्रांचने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी या प्रकरणाची माहिती दिली असून परराष्ट्र मंत्रालयालाकडेही यासंबंधी एक अहवाल पाठवला आहे. 
 

पाक अधिका-याचे बनावट आधार कार्ड

हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी मोहम्मद अख्तरला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या अधिका-याने मेहबूब राजपूत नावाने बनावट आधार कार्डदेखील काढल्याचे समोर आले आहे.

Web Title: Action on the spying govt, then rescued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.