अमेरिकेतील पिझ्झा प्रकरणी वरिष्ठांच्या सल्लयाने कारवाई
By Admin | Published: March 14, 2016 12:22 AM2016-03-14T00:22:10+5:302016-03-14T00:22:10+5:30
जळगाव: महाबळमधील प्रदीप नाईक या तरुणाच्या बॅँक खात्यातून अमेरिकेतील सॅनफ्रॅन्सिस्कोमधील पिझ्झा शॉपमध्ये दोन हजार ७७५ रुपये ऑनलाईन जमा झाल्याच्या प्रकरणात संबंधित व्यक्तीने तक्रार दिलेली नाही, परंतु पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्याशी चर्चा करुन कारवाईचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले यांनी दिली.
ज गाव: महाबळमधील प्रदीप नाईक या तरुणाच्या बॅँक खात्यातून अमेरिकेतील सॅनफ्रॅन्सिस्कोमधील पिझ्झा शॉपमध्ये दोन हजार ७७५ रुपये ऑनलाईन जमा झाल्याच्या प्रकरणात संबंधित व्यक्तीने तक्रार दिलेली नाही, परंतु पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्याशी चर्चा करुन कारवाईचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले यांनी दिली.नाईक यांच्या बॅँक खात्यातून दोन वेळा ही रक्कम काढण्यात आली. त्याबाबतचे ई-मेल नाईक यांना शनिवारी पहाटे प्राप्त झाला होता. संबंधित व्यक्तीने एटीएमच्या माध्यमातून २० वेळा पैसै काढण्याचा प्रयत्न केल्याचा दावा नाईक यांनी केला आहे. नाईक यांनी रविवारी वाडीले यांची भेट घेतली. हे प्रकरण विदेशातील असल्याने बॅँक व्यवस्थापकाकडून तांत्रिक बाजू समजावून घेतल्या जाणार आहे. सोमवारी पोलीस अधिक्षकांशी चर्चा करुन गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला जाईल असे वाडीले म्हणाले.