८५ वाहनांवर कारवाईचा बडगा वाहतूक शाखेची कारवाई : १२ हजार रुपयांची दंडवसुली
By Admin | Published: March 22, 2016 12:41 AM2016-03-22T00:41:37+5:302016-03-22T00:41:37+5:30
जळगाव : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या ८५ वाहनांवर सोमवारी शहर वाहतूक शाखेच्यावतीने कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे १२ हजार रुपयांची दंडवसुली झाली. वाहतूक शाखेने अचानक कारवाई अस्त्र उगारल्याने अवैध प्रवासी वाहतूक करणार्या वाहन चालकांमध्ये खळबळ उडाली होती.
ज गाव : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या ८५ वाहनांवर सोमवारी शहर वाहतूक शाखेच्यावतीने कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे १२ हजार रुपयांची दंडवसुली झाली. वाहतूक शाखेने अचानक कारवाई अस्त्र उगारल्याने अवैध प्रवासी वाहतूक करणार्या वाहन चालकांमध्ये खळबळ उडाली होती.शहरात विविध ठिकाणी असणार्या नो-पार्किंग झोनमध्ये थांबणार्या ऑटोरिक्षा, क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणार्या मिनीडोअर, कागदपत्रे नसलेल्या ॲपेरिक्षा तसेच लायसन्स नसणार्या वाहन चालकांवर वाहतूक शाखेच्यावतीने कारवाई करण्यात आली. सकाळी १० वाजेपासून या कारवाईला सुरुवात झाली होती. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. त्यात ८५ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई झाली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनांना वाहतूक शाखेच्या कार्यालयात आणण्यात आले होते. त्याठिकाणी दंडात्मक कारवाई केल्यानंतर ही वाहने सोडण्यात आली. प्रत्येक वाहनाला नियमानुसार १०० ते ३०० रुपये दंड आकरण्यात आला.या ठिकाणी झाली कारवाईशहरातील टॉवर चौक, अजिंठा चौफुली, इच्छादेवी चौफुली, आकाशवाणी चौफुली, पाचोरा रोड, बसस्थानक परिसर तसेच महामार्गावर ठिकठिकाणी ही कारवाई करण्यात आली. ओंकारेश्वर मंदिर परिसरात धूम स्टाइल दुचाकी चालवणार्यांचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी आल्याने या परिसरात वाहतूक शाखेने ठिकठिकाणी बॅरिकेटिंग केली आहे. काही ठिकाणी फिक्स पॉइण्ट उभारून कर्मचार्यांची नेमणूक केल्याची माहिती वाहतूक शाखेकडून मिळाली.---कोटवाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या ८५ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून पुढेही कारवाई सुरूच राहणार आहे. ही वाहने दंडात्मक कारवाईनंतर सोडण्यात आली.-चंद्रकांत सरोदे, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा