Actor चायवाला! 'या' अभिनेत्यावर अभिनय सोडून चहा विकण्याची वेळ; कारण ऐकून व्हाल भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 02:23 PM2023-05-03T14:23:17+5:302023-05-03T14:31:49+5:30

विकासला अभिनयाची इतकी आवड आहे की त्याने आपल्या चहाच्या स्टॉलला Actor चायवाला असे नाव दिले.

actor chai wala know who is this actor chai wala why did he leave acting and open tea shop | Actor चायवाला! 'या' अभिनेत्यावर अभिनय सोडून चहा विकण्याची वेळ; कारण ऐकून व्हाल भावूक

Actor चायवाला! 'या' अभिनेत्यावर अभिनय सोडून चहा विकण्याची वेळ; कारण ऐकून व्हाल भावूक

googlenewsNext

Actor चायवाला या नावाने प्रसिद्ध झालेल्या विकास आर्यनने अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र आता अभिनय क्षेत्र सोडून आई-वडिलांची सेवा करण्यासाठी स्वत:चा स्टार्टअप सुरू करण्याचा विचार केला. त्यामुळे त्याला सुरुवातीपासून चांगला नफाही मिळत आहे. विकासला अभिनयाची इतकी आवड आहे की त्याने आपल्या चहाच्या स्टॉलला Actor चायवाला असे नाव दिले.

विकास आर्यनने पाटणाच्या बोरिंग रोडवर स्वतःचे स्टार्टअप सुरू केले आहे. विकास सांगतो की तो मुळात पाटण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या मलाहीचा रहिवासी आहे. विकासने बिहारमधूनच शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर तो दिल्लीला रवाना झाला. तेथून त्याने मुंबईपर्यंतचा प्रवास केला.

विकासने आतापर्यंत अशा अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे जे खूप लोकप्रिय झाले. त्याने क्राईम पेट्रोल, सावध इंडिया, कुम-कुम भाग्य, पवित्र बंधन यांसारख्या दैनंदिन टीव्ही शोमध्ये काम केले आहे. यासोबतच त्याने अनेक एड फिल्म्सचे कास्टिंगही केले आहे आणि जाहिरातींमध्येही काम केले आहे.

मुंबईचा निरोप घेतला

विकास आर्यनने सांगितले की, जेव्हा तो मुंबईत होता तेव्हा कोरोनाच्या काळात त्याच्या आईची तब्येत बिघडली होती. त्यानंतर आठवडाभरातच त्यांच्या वडिलांनाही ब्रेन स्ट्रोक आला. अशा परिस्थितीत तो मुंबई सोडून पाटण्याला आई-वडिलांची सेवा करण्यासाठी परतला. मात्र, त्याच्यासाठी हे सोपे नव्हते, कारण त्याला चित्रपट विश्वात पुढे जायचे होते, पण आई-वडिलांची सेवा करण्यासाठी त्याने मुंबईचा निरोप घेतला.

तरुणांना मेहनत करण्याचा दिला मेसेज

विकास आर्यन स्पष्ट करतो की, कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात पालकांची भूमिका महत्त्वाची असते. अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा पालकांना तुमची गरज असते तेव्हा त्यांनी कामाला यावे. त्याचबरोबर कामाबाबत तो म्हणतो की, जगात कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. माणसाने आयुष्यात सतत मेहनत करत राहायला हवी, कारण त्याच्या जोरावरच माणूस पुढे जाऊ शकतो. विकासने त्याच्या चहाच्या स्टॉलवर अनेक चित्रपट संवादही लिहिले आहेत. यासोबतच तो चहा प्यायला येणाऱ्या लोकांना चित्रपटातील संवाद सांगत असतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: actor chai wala know who is this actor chai wala why did he leave acting and open tea shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.