“फक्त RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत”
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 11:22 AM2021-03-31T11:22:45+5:302021-03-31T11:24:39+5:30
KRK on RSS: बॉलिवूडमधील एका अभिनेत्यानेही रा. स्व. संघावर निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) केंद्रातील मोदी सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) वारंवार टीका करीत आहेत. यानंतर आता बॉलिवूडमधील एका अभिनेत्यानेही रा. स्व. संघावर निशाणा साधला आहे. देशात केवळ संघवाले तेवढे देशभक्त आहेत आणि बाकी सगळे देशद्रोही बनले आहेत, असा आरोप या अभिनेत्याने केला आहे. (KRK on RSS)
अभिनेता कमाल खान यांनी एक ट्विट करत RSS वर टीका केली आहे. कमाल खान यांच्या ट्विटवर अनेकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनीही RSS ला यापुढे आता संघ परिवार म्हणणार नाही, असे म्हटले होते. यानंतर आता मनोरंजन क्षेत्रातील अभिनेत्याने संघावर भाष्य केले आहे.
Sometimes I try to understand, what’s the truth? What is right & wrong? And I get reply Nothing. Every Indian knows that Indians were under Britishers. #RSS refused to fight for freedom. Sardar Patel banned #RSS. But today RSS people are #Deshbhakts and all others are #Deshdrohi
— KRK (@kamaalrkhan) March 31, 2021
काय म्हणतात कमाल खान?
अनेकदा समजून घेण्याचा प्रयत्न करतो की, काय खरं आहे? काय बरोबर आहे आणि काय चुकीचे आहे? परंतु, याचे उत्तर मिळत नाही. प्रत्येक भारतीयाला तो ब्रिटिशांच्या अमलाखाली होता, हे माहिती आहे. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यास नकार दिला. सरदार पटेल यांनीही RSS वर बंदी आणली होती. पण, आज केवळ रा. स्व. संघवाले तेवढे देशभक्त म्हणवून घेत आहेत आणि बाकी सगळे देशद्रोही ठरताहेत, असे ट्विट कमाल खान यांनी केले आहे.
राहुल गांधी फक्त मुलींच्या कॉलेजलाच भेट देतात; माजी खासदाराचे वादग्रस्त विधान
यापुढे ‘संघ परिवार’ म्हणणार नाही
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाशी संबंधित संघटनांना यापुढे आपण ‘संघ परिवार’ असे संबोधणार नाही, अशा आशयाचे ट्विट काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी यांनी केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यांच्याशी संबंधित संघटनांना परिवार संबोधणे चुकीचे ठरेल. कारण परिवारात महिला व ज्येष्ठांप्रती आदर आणि प्रेम दाखवले जाते; परंतु संघ परिवारात तसे काही आढळत नाही. म्हणूनच संघ आणि संघाशी संबंधित संघटनांना परिवार संबोधणे चुकीचे ठरेल, असे ट्विट राहुल यांनी केले. आपण यापुढे ‘संघ परिवार’ असा उच्चार करणार नाही, असेही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले.