अभिनेता कुणाल खेमूवर दगडफेक
By admin | Published: June 12, 2016 12:45 PM2016-06-12T12:45:46+5:302016-06-12T12:55:07+5:30
उत्तर प्रदेशच्या राजधानीत कुणाल खेमूवर हल्ला झाल्याची घटना घडलीये. कुणाल आगामी सांवरे या चित्रपटाच्या व्हिडीओ शूटिंगसाठी लखनऊमध्ये गेला होता.
ऑनलाइन लोकमत
लखनऊ. दि. १२ : उत्तर प्रदेशच्या राजधानीत शुटींगसाठी आलेल्या अभिनेता कुणाल खेमूवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे . कुणाल आगामी सांवरे या चित्रपटाच्या व्हिडीओ शूटिंगसाठी लखनऊमध्ये गेला होता. त्यावेळी शनिवारी रात्री एका समूहाने या शूटिंगला विरोध केला. यावेळी दगडफेकही करण्यात आली. यात कुणालच्या हाताला दुखापत झालीये. मिळालेल्या माहितीनुसार, सांवरे या चित्रपटाच्या शूटिंगला काही लोकांचा विरोध होता. या चित्रपटातील एका गाण्याला पाकिस्तानी सिंगर राहत फतेह अली खानचा आवाज आहे. या रेकॉर्डिंगसाठी राहत तेथे उपस्थित होता.
व्हिडिओमध्ये कुणाल खेमू आणि मिस इंडिया वर्तिका सिंह दिसणार आहेत. सांवरे आर्मी बॅकग्राऊंड असलेले गाणे आहे. या गाण्यात कुणाल एक आर्मी ऑफिसरच्या रुपात दिसणार असल्याचे वृत्त आहे. प्रोड्युसर निखिल द्विवेदींना यावर विचारले असता ते म्हणाले, शूटिंगसाठी आम्ही परवानगी मागितली होती. मात्र परवानगी दिली नव्हती. त्यानंतरही आम्ही शूटिंग करत होतो.