अभिनेता सोनू सूद लॉन्च करतोय 'Sonu For You App', रुग्णांना मिळणार दिलासा; होणार मोठा फायदा...!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 07:06 PM2021-03-05T19:06:34+5:302021-03-05T19:07:50+5:30
आपल्या आयुष्यातील 20 मिनिटे या रुग्णाच्या नावे द्यावे लागतील. यामुळे मृत्यूशी झुंज देत असलेल्या रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता अनेक पटींनी वाढेल. (Sonu for you app)
मुंबई - लॉकडाउन काळात गरजू नागरिकांसाठी अक्षरशः देवदूत म्हणून समोर आलेला अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) आता गरजू रुग्णांसाठी धावून आला आहे. आता सोनू एक खास अॅप (Sonu For You) लॉन्च करत आहे. यामुळे, केवळ वेळेवर रक्त मिळाले नाही म्हणून होणाऱ्या मृत्यू दरात घट होऊ शकते. अर्थात केवळ वेळेवर रक्त मिळाले नाही, म्हणून रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण कमी व्हायला मदत होईल. (Actor Sonu Sood will launch Sonu for you app this app will get blood to every needy)
आई शप्पथ...म्हणत चाहत्याने मागितला स्मार्टफोन, सोनू सूदने असे दिले उत्तर
Sonu For You App करणार लॉन्च -
सोनूने Sonu For You नावाने एक अॅप तयार केले आहे. यात रक्त घेणारा आणि रक्त दाता थेट एकमेकांशी जोडले जातील. म्हणजेच हे अॅप रक्त दाता आणि रुग्णांमध्ये एका सेतूचे काम करेल. या अॅपमुळे कोणत्या रुग्णाला, कुठल्या ठिकाणी रक्ताची आवश्यकता आहे. हे या अॅपच्या माध्यमाने आपल्याला अपोआप कळू शकेल. हे समजल्यानंतर, आपल्याला केवळ आपल्या आयुष्यातील 20 मिनिटे या रुग्णाच्या नावे द्यावे लागतील. यामुळे मृत्यूशी झुंज देत असलेल्या रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता अनेक पटींनी वाढेल.
सोनू सूदने ट्विट करून दिली माहिती -
अभिनेता सोनू सूदने स्वतःच आपल्या ट्विटर हॅन्डलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्याने अनेक महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष आकर्षित केले आहे. यात त्याने म्हटले आहे, की रोज सुमारे 12 हजार लोकांचा मृत्यू केवळ वेळेवर रक्त न मिळाल्याने होतो. आणि आपले 20 मिनिटे त्या 12 हजार लोकांचा जीव वाचविण्यासाठी मोलाचे ठरू शकतात. एवढेच नाही, तर लोकांचा जीव वाचविण्यासाठी आपल्याला डॉक्टर होण्याची आवश्यकता नाही. तर रक्तदान करा, असेही या व्हिडिओच्या माध्यमाने सोनूने सांगितले आहे.
Let's save lives.
— sonu sood (@SonuSood) March 3, 2021
Your own Blood Bank coming soon.@IlaajIndia@SoodFoundationpic.twitter.com/ZaZIafx46Y
हे अॅप केव्हा लॉन्च होणार यासंदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, मिळालेल्या माहितीवरून, हे अॅप लवकरच लॉन्च कण्याची पूर्ण तयारी झाली असल्याचे समजते.