Lok Sabha Election 2019 : अभिनेता सनी देओल यांचा उमेदवारी अर्ज दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 12:26 PM2019-04-29T12:26:55+5:302019-04-29T12:44:29+5:30

बॉलिवूड अभिनेता सनी देओल यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Actor turned politician Sunny Deol files his nomination as the BJP candidate from the Gurdaspur parliamentary constituency | Lok Sabha Election 2019 : अभिनेता सनी देओल यांचा उमेदवारी अर्ज दाखल 

Lok Sabha Election 2019 : अभिनेता सनी देओल यांचा उमेदवारी अर्ज दाखल 

Next

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सनी देओल यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सनी देओलभाजपाकडूनलोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना भाजपानेपंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदार संघातून भाजपाने उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता राजकीय आखाड्यात सनी देओल आपले नशीब आजमावणार आहेत.

सनी देओल यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सनी देओल यांनी आपल्या उमेदवारी अर्ज भरताना  पगडी परिधान केली होती. तसेच, त्यांनी 'अजय सिंह देओल' या नावाने अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह आणि जितेंद्र सिंह उपस्थित होते. तसेच, सनी देओल यांचा भाऊ आणि अभिनेता बॉबी देओल यांनीही हजेरी लावली होती. 


दरम्यान, गुरुदासपूर मतदार संघातून अभिनेता विनोद खन्ना यांच्या निधनानंतर अभिनेता सनी देओल यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे.  सनी देओलसमोर काँग्रेसचे उमेदवार सुनील जाखड यांचे आव्हान आहे. सुनील जाखड विद्यमान खासदार आहेत. 

सनी देओल यांचे वडील व ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे भाजपाशी जोडले गेलेले आहेत. 2004 मध्ये भाजपाच्या तिकिटावर त्यांनी राजस्थानच्या बिकानेरमधून निवडणूक लढवली होती. त्यांनी खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर स्वत: ला राजकारणापासून वेगळे केले होते; परंतु ते मागील काही दिवसांपासून मथुरेत पत्नी हेमामालिनी यांच्यासाठी जो निवडणूक प्रचार करीत होते, ते पाहता राजकारणाबाबत त्यांचे मन बदलत आहे की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

हिन्दुस्तान जिंदाबाद था, है, और रहेगा!, मोदींच्या हातात 'ढाई किलोचा हात'
अभिनेता सनी देओलने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यावेळी मोदींनी सनी देओलसोबतचा आपला फोटो ट्विटरवर शेअर करत, आम्ही दोघेही 'हिंदुस्थान जिंदाबाद था, है, और रहेगा'साठी एकत्र असल्याचे म्हटले होते. 

सनी देओल फिल्मी, पण मी खरा फौजी; कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा टोला
अभिनेता सनी देओल यांच्यावर पंजाबचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी निशाना साधला होता. यावेळी अमरिंदर सिंह यांनी सनी देओल केवळ फिल्मी असल्याचे सांगत, आपण असली फौजी असल्याचे म्हटले होते. यावर सनी देओलकडून  काहीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. 
 

Web Title: Actor turned politician Sunny Deol files his nomination as the BJP candidate from the Gurdaspur parliamentary constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.