अभिनेत्यांना बनवलं नेता, पण यांनी लोकसभेत चकार शब्दही काढला नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 10:15 AM2024-02-14T10:15:05+5:302024-02-14T10:15:53+5:30
सर्वाधिक चर्चेत भाग कुणी घेतला? वाचा सविस्तर
नवी दिल्ली : १७ व्या लोकसभेच्या कामकाजादरम्यान अभिनेता-राजकारणी सनी देओल (भाजप) आणि शत्रुघ्न सिन्हा (टीएमसी) यांच्यासह इतर नऊ लोकसभा सदस्यांनी कोणत्याही चर्चेत भाग घेतला नाही.
१०० टक्के उपस्थिती कोणाची?
भाजपचे मोहन मंडावी आणि भागीरथ चौधरी
एकूण २७४ बैठकांमध्ये १०० टक्के उपस्थिती
योगायोग : लोकसभेत पोहोचलेल्या या दोन सदस्यांना सभागृहात एकमेकांच्या शेजारीच जागा.
सर्वाधिक चर्चेत भाग कुणी घेतला?
पुष्पेंद्रसिंह चंदेल भाजप (हमीरपूर), कुलदीप राय शर्मा अंदमान आणि निकोबार बेट, मलूक नगर (बसपा) , डीएनव्ही सेंथिलकुमार द्रमुक, एनके प्रेमचंद्रन आरएसपी, सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
कोणत्याही चर्चेत भाग घेतला नाही
अभिनेता-राजकारणी सनी देओल (भाजप), शत्रुघ्न सिन्हा (टीएमसी), भाजपचे खासदार रमेश जिनजीनगी, बीएन बचेगौडा, प्रधान बरुआ, अनंत कुमार हेगडे आणि व्ही. श्रीनिवास प्रसाद, टीएमसी खासदार दिब्येंदु अधिकारी आणि बसपा खासदार अतुल कुमार राय.