...म्हणून कंगना राणौतला दिली ‘Y’ दर्जाची सुरक्षा, मोदी सरकारने सांगितलं खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 03:16 PM2020-09-12T15:16:27+5:302020-09-12T15:17:40+5:30

केंद्राने कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला. मात्र आता वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यामागचं खरं कारण समोर आलं आहे. 

actress kangana ranauts y plus security cover came on her fathers request | ...म्हणून कंगना राणौतला दिली ‘Y’ दर्जाची सुरक्षा, मोदी सरकारने सांगितलं खरं कारण

...म्हणून कंगना राणौतला दिली ‘Y’ दर्जाची सुरक्षा, मोदी सरकारने सांगितलं खरं कारण

Next

नवी दिल्ली - अभिनेत्री कंगना राणौतला केंद्रीय गृहमंत्रालयाने वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला. शिवसेना आणि कंगना राणौत यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाकयुद्ध सुरू आहे. मुंबईबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं कंगना शिवसेनेच्या निशाण्यावर आहे. कंगनाला शिवसेनेकडून थेट इशारा देण्यात आला आहे. कंगनाने देखील शिवसेनेला प्रतिआव्हान दिलं आहे. त्यानंतर केंद्राने कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला. मात्र आता वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यामागचं खरं कारण समोर आलं आहे. 

केंद्रीय गृहराज्य मंत्री जी. किशन रेड्डी यांनी कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यामागचं कारण सांगितलं आहे. कंगनाच्या सुरक्षेबाबत तिच्या वडिलांनी हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. "कंगना रणौत सोशल मीडियावर तिची मतं मांडत असल्याने महाराष्ट्रातील काही लोकांनी त्यावर आक्षेप घेतला. तिला धमक्या येऊ लागल्या आहेत. त्यामुळे तिला सुरक्षा पुरवण्यात यावी" असं निवेदन कंगनाच्या वडिलांनी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना दिलं. त्यानंतर हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला या परिस्थितीची कल्पना दिली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला" अशी माहिती रेड्डी यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे. 

वाय दर्जाच्या सुरक्षेसाठी येणारा खर्च कोण देणार याबाबत विचारले असता  रेड्डी यांनी काहीच उत्तर दिलेलं नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. केंद्राने वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतल्यानंतर कंगनाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे आभार मानले. 'सध्याच्या परिस्थिती पाहता काही दिवस मुंबईला जाऊ नको, असा सल्ला अमित शहाजी देऊ शकले असते. मात्र त्यांनी भारताच्या एका कन्येला दिलेल्या शब्दाचा मान राखला. आमच्या स्वाभिमानाची, आत्मसन्मानाची लाज राखली. जय हिंद!,' अशा शब्दांत कंगनानं शहांचे आभार मानले होते. 

‘Y’ दर्जाची सुरक्षा म्हणजे काय?, जाणून घ्या...

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून वाय दर्जाची सुरक्षा ज्या व्यक्तींना दिली जाते त्यांच्या सुरक्षेसाठी 11 जवान तैनात असतात. यात 1 किंवा 2 कमांडो, 2 पीएसओ यांचा समावेश असतो. मागील वर्षी केंद्राने 11 पेक्षा जास्त लोकांना Y दर्जाची सुरक्षा दिली होती. ज्यात युपीचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांचाही समावेश होता. म्हणजे आता कंगनासाठी 1 किंवा 2 कमांडो, 2 पीएसओ आणि अन्य जवानांचा समावेश असणार आहे. यात एकूण 11 जवान संबंधित व्यक्तीच्या सुरक्षेसाठी तैनात असतात.

केंद्राकडून कोणकोणत्या सुरक्षा दिल्या जातात?

देशात विविध स्तरावर केंद्रीय गृहमंत्रालय सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी घेते. यात नेत्यांपासून, व्हीआयपी आणि अशा व्यक्तिंना सुरक्षा देतात ज्यांच्या जीवाला धोका आहे. धमकीच्या दर्जाने सुरक्षा सुविधा देण्यात येते. यात X, Y, Z, Z+ अशा विविध दर्जाच्या सुरक्षा असतात.  X कॅटेगिरीमध्ये 2 पोलीस कर्मचारी, Y कॅटेगिरीमध्ये 11 जवान, Z कॅटेगिरीत 22 जवान यात एनएसजी कमांडोचा समावेश असतो. तर Z+ सुरक्षेत NSG कमांडोसह ३६ जवान सुरक्षेसाठी तैनात असतात. यावर जी सुरक्षा व्यवस्था असते ती म्हणजे एसपीजी..जी देशाच्या पंतप्रधानांना दिली जाते.

कंगना राणौत आणि शिवसेना यांच्या संघर्षाची सुरुवात कंगनाच्या विधानानं झाली. ज्यात तिने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप करत त्यांनी मुंबईत येऊ नये असं धमकावल्याचं सांगितले. याबाबत कंगनानं ट्विट करुन म्हटलं होतं की, संजय राऊत यांनी मला उघडपणे मुंबईत न येण्याची धमकी दिली आहे. मुंबईच्या गल्लोगल्ली स्वातंत्र्याचे नारे लावले जात होते आणि आता उघडपणे धमकी मिळत आहे. मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय? असं तिने म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : लढ्याला यश! स्वदेशी लसीची प्राण्यांवर यशस्वी चाचणी, भारत बायोटेकची घोषणा 

"शिवसैनिकांनीच मारहाण केली, राष्ट्रपती राजवट लागू करा", 'त्या' अधिकाऱ्याच्या मुलीची मागणी

"उद्धव ठाकरेंनी अयोध्येला येऊ नये नाहीतर..."; कंगनाच्या समर्थनार्थ मुख्यमंत्र्यांना धमकी

"महाविकास आघाडी सरकार व न्यायालयावर पूर्ण विश्वास", मराठा आरक्षणावर रोहित पवार म्हणतात...

"अरविंद केजरीवाल जिवंत आहेत तोपर्यंत असं होणार नाही", आपचा भाजपावर हल्लाबोल

Web Title: actress kangana ranauts y plus security cover came on her fathers request

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.