अभिनेत्री रिमी सेनचा भाजपात प्रवेश

By admin | Published: January 24, 2017 04:51 PM2017-01-24T16:51:18+5:302017-01-24T18:23:08+5:30

सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. अमूक पक्षाच्या नेत्याने तमूक पक्षात प्रवेश केला. अशा अनेक राजकीय पक्षांच्या चर्चेला उधान झाल्याचे दिसून येत आहे.

Actress Rimi Sen enters BJP | अभिनेत्री रिमी सेनचा भाजपात प्रवेश

अभिनेत्री रिमी सेनचा भाजपात प्रवेश

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अमूक पक्षाच्या नेत्याने तमूक पक्षात प्रवेश केला. अशा अनेक राजकीय पक्षांच्या चर्चेला उधाण झाल्याचे दिसून येत आहे. यातच बॉलिवडूमंडळी सुद्धा राजकरणापासून मागे कसे राहतील? ते सुद्धा राजकणात येऊन आपली एक नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना दिसतात.
बॉलिवूड अभिनेत्री आणि बिग बॉसमध्ये स्पर्धक राहिलेली रिमी सेन हिने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. रिमी हिच्यासोबतच भोजपुरी अभिनेत्री कशिश खान हिने सुद्धा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.
याचबरोबर मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता सनी देओल पण या पार्टीत सामील होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि जॅकी श्रॉफ यांच्या भारतीय जनता पार्टीत सामील होण्याच्या चर्चा सुरु होत्या. 
 

Web Title: Actress Rimi Sen enters BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.