Adani: अदानीं संपत्ती वाढीचा वेग जगात सर्वाधिक; अदानी इतके श्रीमंत कसे झाले?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 09:45 AM2022-08-31T09:45:12+5:302022-08-31T09:45:37+5:30
Adani: भारतीय अब्जाधीश गौतम अदानी १३७.४ अब्ज डॉलर (सुमारे ११ लाख कोटी रुपये) संपत्तीसह जगातील तिसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत.
नवी दिल्ली : भारतीय अब्जाधीश गौतम अदानी १३७.४ अब्ज डॉलर (सुमारे ११ लाख कोटी रुपये) संपत्तीसह जगातील तिसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. फ्रान्सच्या बर्नार्ड अरनॉल्ट यांना मागे टाकत त्यांनी हे स्थान मिळवले आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकाच्या पहिल्या तीनमध्ये आशियाई व्यक्तीने प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
अदानी आता श्रीमंतीत मस्क आणि बेझोस यांच्या मागे आहेत. टेस्लाचे संस्थापक इलॉन मस्क २५१ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह या यादीत अव्वल, तर बेजोस १५३ अब्ज डॉलर्ससह दुसऱ्या स्थानावर आहेत. टॉप-१० यादीत अदानी हे एकमेव भारतीय आहेत. रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी ९१.१ अब्ज (७.३ लाख कोटी रुपये) संपत्तीसह ११व्या क्रमांकावर आहेत. अदानी सतत गुंतवणुकीचा विस्तार करत असून, लवकरच ते आणखी श्रीमंत होतील, असा अंदाज बांधला जात आहे.
गेल्याच महिन्यात टाकले बिल गेट्स यांना मागे
n गेल्या महिन्यात अदानी हे चौथे सर्वात श्रीमंत उद्योगपती ठरले होते. त्यांनी बिल गेट्स यांना मागे टाकले होते.
n केवळ २०२२ मध्ये अदानी यांनी त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये ६०.९ अब्ज डॉलरची भर घातली आहे. हे प्रमाण कोणत्याही व्यावसायिकापेक्षा ५ पट अधिक आहे.
n त्यांनी फेब्रुवारीमध्ये रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना सर्वात श्रीमंत
आशियाई म्हणून मागे टाकले होते.
४.८
लाख कोटी रुपये अदानींनी केवळ या वर्षी कमावले
३२
पेक्षा अधिक व्यवहार केवळ एका वर्षांत अदानींनी केले.
१.३१
लाख कोटींपेक्षा अधिकचे सौदे गेल्या वर्षभरात अदानींने केले.
५ पट
अधिक रक्कम कोणत्याही व्यावसायिकापेक्षा कमावली
व्यवसाय कोणते?
n हिरे, सिमेंट
n अक्षय उर्जा
n बंदरे
n विमानतळे
n गॅस
n कोळसा उत्खनन
n प्रसारमाध्यमे
आशियाई
क्षेत्रात सर्वाधिक व्यवहार करणारा समूह म्हणून अदानी समूह आघाडीवर आहे.
सिमेंट व्यवसायातही पाऊल ठेवले
मे महिन्यात गौतम
अदानींच्या कंपनीने
होल्सीमचा भारतीय
सिमेंट व्यवसाय खरेदी करण्याची घोषणा केली होती. हा करार १०.५ अब्ज डॉलरमध्ये झाला होता. या करारामुळे, अदानी समूह भारतीय सिमेंट बाजारात दुसऱ्या स्थानावर पोहोचला.
कोणती विमानतळे ताब्यात?
मुंबई, अहमदाबाद, लखनउ, जयपूर, मंगळुरू, गुवाहाटी, तिरुवनंतपुरम या शहरांतील विमानतळ्यांचा समावेश आहे.
जगातील
१० श्रीमंत
इलॉन मस्क २०
जेफ बेजोस १२.२
गौतम अदानी ११
बर्नाड अरनॉल्ट १०.८
बिल गेट्स ९.३४
वॉरेन बफे ७.९८
लॅरी पेज ७.९८
सर्गेंई ब्रिन ७.६४
स्टिव्ह बाल्मर ७.४७
लॅरी एलिसन ७.४४
आकडे लाख काेटींत
स्राेत : ब्लूमबर्ग अब्दाधीश निर्देशांक
अदानी इतके श्रीमंत कसे झाले?
कोरोन महामारीपासून (२०२०) अदानी समूहाचे शेअर्स जवळपास १ हजार टक्क्यांनी वधारले आहेत. तर अमेरिकेतील श्रीमंत संपत्ती दान करत आहेत. त्यामुळे त्यांच्या मानांकनात घसरण झाली आहे. एप्रिल २०२१ मध्ये, अदानींची एकूण संपत्ती ५७ अब्ज होती. २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात अदानींची संपत्ती जगात सर्वात वेगाने वाढली.