अदानी समूहाने केला ५० हजार कोटींचा घोटाळा : काँग्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 01:08 AM2017-08-19T01:08:44+5:302017-08-19T01:08:47+5:30

५० हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून २०१३ पासून फसविले असले, तरी केंद्र सरकार ती कंपनी गौतम अदानी यांची असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

Adani group scam: Rs 50,000 crore scam: Congress | अदानी समूहाने केला ५० हजार कोटींचा घोटाळा : काँग्रेस

अदानी समूहाने केला ५० हजार कोटींचा घोटाळा : काँग्रेस

Next

शीलेश शर्मा।
नवी दिल्ली : प्रत्यक्ष व्यवसाय न करणाºया कंपन्यांच्या माध्यमातून अदानी समूहाने एकाच फटक्यात ५० हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून २०१३ पासून फसविले असले, तरी केंद्र सरकार ती कंपनी गौतम अदानी यांची असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशीर्वादही आहे, असा आरोप काँग्रेसने शुक्रवारी येथे केला.
पक्षाचे नेते अजय माकन म्हणाले की, महसूल गुप्तचर विभागाच्या ९७ पानांच्या अहवालात अदानी समूहाने बनावट कंपन्यांच्या मदतीने वीज सयंत्रांची खरेदी चीन आणि कोरियातून करून ती थेट भारतात पाठवली, परंतु त्याची बिले व इतर दस्तावेजांत ही खरेदी संयुक्त अरब अमिरातची कंपनी इलेक्ट्रोजन इन्फ्रा एफझेडईकडून केल्याचे दाखवले. संयुक्त अरब अमिरातची ही बनावट कंपनी अदानी यांनीच घोटोळे करण्यासाठीच स्थापन केली होती. या सगळ््या प्रकाराची केंद्रीय गुप्तचर खात्याकडून (सीबीआय) सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली झाली पाहिजे.
>अहवाल का दडपला?
माकन म्हणाले की, पंतप्रधान लाल किल्ल्यावरून भ्रष्टाचारविरोधाच्या गप्पा करतात. मग फेब्रुवारी, २०१३ मध्ये यूपीए सरकारने जी चौकशी सुरू केली व त्याचा जो अहवाल दाखल झाला, तो दडपून का टाकला जात आहे? माकन यांनी या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशीची मागणी केली. या भ्रष्टाचाराचा थेट फटका वीजग्राहकांना बसला आहे, असे सांगून, अदानी समूहाकडून जेथे कोठे वीजपुरवठा केला जात आहे. तेथील विजेचा दर युनिटमागे दोन रुपयांनी कमी केला जावा, अशी मागणी माकन यांनी केली.
>आरोप खोटे; कंपनीचा खुलासा
अजय माकन यांनी केलेल्या आरोपांचा अदानी समूहाने पत्रकाद्वारे इन्कार केला आहे. हे आरोप सनसनाटी निर्माण करण्यासाठी आहेत, त्यात तथ्य नाही आणि सर्व नियम व नियामक संस्थांच्या आधीन राहून आम्ही सर्व व्यवहार केले आहेत, महसूल गुप्तचर संचालनालयाने केलेल्या चौकशीत आम्ही पूर्णपणे सहकार्य केले होते, असे समूहाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. मात्र, चौकशीच्या अहवालाविषयी प्रवक्त्याने कोणतेही भाष्य केलेले नाही.

Web Title: Adani group scam: Rs 50,000 crore scam: Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.