अदानींचे नौदलासाठी मानवरहित विमान; नौदलप्रमुख ७५ कर्मचाऱ्यांसह कार्यक्रमाला होते उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 01:32 PM2024-01-11T13:32:27+5:302024-01-11T13:33:33+5:30
‘अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस’कडून स्वदेशी बनावटीच्या ‘दृष्टी १० स्टारलाइनर’ विमानाचे अनावरण
हैदराबाद : ‘अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस’ने बुधवारी भारतीय नौदलासाठी स्वदेशी बनावटीच्या ‘दृष्टी १० स्टारलाइनर’ मानवरहित हवाई विमानाचे (यूएव्ही) अनावरण केले. नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार यांनी विमानांना हिरवा झेंडा दाखवला. नौदलप्रमुख नौदलाच्या ७५ कर्मचाऱ्यांसह या कार्यक्रमाला उपस्थित होते. ही विमाने हैदराबादहून पोरबंदरकडे नौदलात सामील होण्यासाठी रवाना झाली. दृष्टी १० स्टारलाइनर ही प्रगत हेरगिरी यंत्रणा आहे, ज्यामध्ये ४५० किलोंचे वजन ३६ तास तोलून धरण्याची क्षमता आहे. ‘स्टॅनैग ४६७१‘ प्रमाणपत्र असलेले हा एकमेव सर्व प्रकारच्या हवामानात कार्यरत राहणारा लष्करी प्लॅटफॉर्म आहे.