कर्जात बुडालेल्या 'या' पॉवर कंपनीला विकत घेण्याच्या शर्यतीत अदानी; 'ही' कंपनी देणा मोठी टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 02:46 PM2022-06-25T14:46:47+5:302022-06-25T14:48:39+5:30

जेपीएल आणि अदानी पॉवर या दोन्ही कंपन्यांनी, ही कंपनी विकत घेण्यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EOI) सादर केले असून बोलीचे मूल्यांकनही करत आहेत.

adani power and jindal power in race to buy ind barath thermal the plant is closed since 2016 | कर्जात बुडालेल्या 'या' पॉवर कंपनीला विकत घेण्याच्या शर्यतीत अदानी; 'ही' कंपनी देणा मोठी टक्कर

कर्जात बुडालेल्या 'या' पॉवर कंपनीला विकत घेण्याच्या शर्यतीत अदानी; 'ही' कंपनी देणा मोठी टक्कर

Next

गौतम अदानी यांची कंपनी अदानी पॉवर आणि नवीन जिंदाल यांची कंपनी जिंदाल पॉवर (JPL) या दिवाळखोर कंपनी थर्मल पॉवर प्लांट इंड-बारथ थर्मल पॉवर (Ind-Barath Thermal) खरेदी करण्याच्या शर्यतीत समोरा-समोर आल्या आहेत. ही कंपनी खरेदी करण्याची अदानी समूह आणि जिंदाल समूह या दोघांचीही इच्छा आहे, असे इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हणण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेपीएल आणि अदानी पॉवर या दोन्ही कंपन्यांनी, ही कंपनी विकत घेण्यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EOI) सादर केले असून बोलीचे मूल्यांकनही करत आहेत. संभाव्य खरेदीदारांना प्लांट पुन्हा सुरू करण्यासाठी सुमारे 75 कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल, असे बिडर्सना पाठवलेल्या नोटमध्ये म्हणण्यात आले आहे. 

वीज निर्माता कंपन्यांमधील इंटरेस्ट वाढला - 
खरे तर, इलेक्ट्रिसिटीच्या कमतरतेमुळे, संकटात असलेल्या वीज कंपन्यांमध्ये दिग्गज उद्योगपतींचा रस वाढला आहे. तसेच, सरकारनेदेखील राज्यांच्या बँकांना, त्यांना मदत म्हणून फायनान्स करण्यास सांगितले आहे.

तमिळनाडूची आहे कंपनी - 
Ind-Barath ही कंपनी तमिळनाडूतील तुतीकोरिन येथे आहे. येथे150 मेगावॅट क्षमतेचे दोन पूर्ण इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन यूनिट आहेत. मात्र, आर्थिक संकटात सापडल्याने हा प्लँट तब्बल 2016 पासून बंद आहे. Ind-Barath Thermal ही एक दिवाळखोर कंपनी आहे. जिच्यावर प्रचंड कर्ज आहे. या कंपनीवर तब्बल 2,148 कोटी रुपयांचे कर्ज आहे. यात 21 टक्के कर्ज पंजाब नॅशनल बँकेचे आहे. 18 टक्के कर्ज स्टेट बैंक ऑफ इंडियाचे आणि उर्वरीत कर्ज बँक ऑफ बडोदा, अॅक्सिस बँक आणि केनरा बँकने दिले आहे.

Web Title: adani power and jindal power in race to buy ind barath thermal the plant is closed since 2016

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.