पाळधी ते धरणगांव नवीन रेल्वे मार्गावरुन धावली एक्सप्रेस

By admin | Published: March 22, 2016 12:40 AM2016-03-22T00:40:56+5:302016-03-22T00:40:56+5:30

जळगाव : पश्चिम रेल्वेच्या उधना -जळगाव रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून या मार्गावरुन पाळधी ते धरणगांव दरम्यानच्या नवीन मार्गाचे उद्घाटन सोमवारी सकाळी ९:१० मिनीटांनी अप नवजीवन एक्सप्रेस ही गाडी चालवून करण्यात आले. यामुळे या मार्गाच्या प्रवासात आर्धा तासा वेळेची बचत होणार आहे.

Adarsh ​​Run from Dhadangaon New Railway route to Paladhi | पाळधी ते धरणगांव नवीन रेल्वे मार्गावरुन धावली एक्सप्रेस

पाळधी ते धरणगांव नवीन रेल्वे मार्गावरुन धावली एक्सप्रेस

Next
गाव : पश्चिम रेल्वेच्या उधना -जळगाव रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून या मार्गावरुन पाळधी ते धरणगांव दरम्यानच्या नवीन मार्गाचे उद्घाटन सोमवारी सकाळी ९:१० मिनीटांनी अप नवजीवन एक्सप्रेस ही गाडी चालवून करण्यात आले. यामुळे या मार्गाच्या प्रवासात आर्धा तासा वेळेची बचत होणार आहे.
यावेळी पश्चिम रेल्वेचे मुख्य अभियंता राजेश कुमार, मुख्य अभियंता इलेक्ट्रीक वाय. पी. सिंग, उपमुख्य अभियंता एस.डी. मीना (जळगाव), ठेकेदार एल. के. गोयल यांच्या उपस्थितीत या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले.
रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण होत असल्याने या मार्गावरील वाहतुकीची गती वाढणार आहे. यामुळे चाकरमनी, व्यवसायिक व प्रवाशांच्या प्रवासाच्या वेळेची बतच होणार आहे. दुहेरीकरणाचे काम सुरू झाल्यापासून या मार्गावरुन वाहतूक धिम्या गतीने होत होती. मार्गा वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी १० ते १७मार्च दरम्यान रेल्वे प्रशासनाने या मार्गावर धावणारी सायंकाची भुसावळ -सुरत पॅसेंजर बंद ठेवण्यात आली होती.
वर्षभरापूर्वीच झाले काम
उधना-जळगाव मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम तीन वर्षापूर्वी सुरू करण्यात आले होते. पाळधी ते धरणगाव या १९ कि. मी. च्या रेल्वे मार्गाचे कामपूर्ण करण्यासाठी मार्च २०१७ ची मुदत देण्यात आली होती. मात्र तब्बल एक वर्षापूर्वीच या मार्गाचे काम करुन तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे जळगाव -उधना, सुरत मार्गावरचा प्रवासात आर्ध्यातासांची बचत होणार आहे. यापूर्वी ऑगस्ट २०१३ मध्ये याच मार्गावरील धरणगाव ते अमळनेर या २४ कि.मी.चा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता.
१४४ किमीचे काम पूर्ण
जळगाव -उधना या ३०४ रेल्वे मार्गावर आता पर्यंत बारडोली ते चिंचपाड ९० कि.मी.,अमळनेर ते धरणगाव २५ व धरणगांव ते पाळधी १९ कि.मी. अशा जवळपास १४४ कि.मी. मार्गाचे काम आतापर्यंत पूर्ण झाले असून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
पाळधी -जळगावचे काम अपूर्ण
पाळधी ते जळगाव दरम्यानच्या रेल्वे मार्गाचे काम जवळ जवळ पूर्ण झाले आहे. मात्र शहरातील दूध फेडरेशन समोरील झोपडप˜ी भागातील २०० मीटर रुळाचे काम बाकी आहे. झोपडप˜ीचे अतिक्रमण निघाल्यावर या लाईनचे काम पूर्ण होणार आहे. यामुळे पाळधी ते जळगाव या १० की.मी मार्गवरुन रेल्वे धावणे अद्याप बाकी आहे.

Web Title: Adarsh ​​Run from Dhadangaon New Railway route to Paladhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.