आदर्श घोटाळा : माजी लष्करप्रमुखांसह ज्येष्ठ सेनाधिकाऱ्यांवर कारवाई ?
By admin | Published: July 9, 2017 12:30 PM2017-07-09T12:30:51+5:302017-07-09T12:30:51+5:30
आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रसंगी लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची चिन्हे दिसत आहेत. संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रसंगी लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची चिन्हे दिसत आहेत. संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या उच्चस्तरीय चौकशीत या घोटाळ्याप्रकरणी दोन माजी लष्करप्रमुख आणि लष्कराच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. आता या प्रकरणात या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होणाऱ आहे.
आदर्श घोटाळ्याप्रकरणी सादर करण्यात आलेल्या 199 पानांच्या अहवालात माजी लष्करप्रमुख एन.सी. वीज (2002 ते 2005) आणि दीपक कपूर (2007 ते 2010) यांच्या सह तीन माजी लेफ्टनंट जनरल आणि चार मेजर जनरल आणि अन्य लष्करी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या अहवालात ज्या अधिकाऱ्यांचे नाव आहे त्यातील बहुतेकांना आदर्श सोसायटीमध्ये फ्लॅट मिळालेला आहे. तसेच ज्या माजी लेफ्टनंट जनरल पदावरील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यात जी.एस. सिहोटा, तेजिंदर सिंह आणि शंतनू चौधरी यांचा समावेश आहे, तर ज्या मेजर जनरल पदावरील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे त्यात ए.आर. कुमार, व्ही.एस. यादव, टी. के. कौल आणि आर. के. हुडा यांचा समावेश आहे. या सर्व अधिकाऱ्यांचा 2011 साली संरक्षण मंत्रालयाला सादर करण्यात आलेल्या लष्कराच्या अंतर्गत अहवालातही उल्लेख होता.
1999 साली झालेल्या कारगील युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी मुंबईतील कुलाबा परिसरात आदर्श सोसायटी बांधण्यात आली होती. पण लष्करी अधिकारी, राजकारणी, अधिकारी यांनी संगनमत करून या सोसायटीमधील घरे लाटली होती.