क्रॉप्टन जोड

By admin | Published: August 22, 2015 12:43 AM2015-08-22T00:43:35+5:302015-08-22T00:43:35+5:30

संपकरी कामगारांचे प्रतिनिधी शरद पाटील, चंद्रकांत गुरव, सोमनाथ जाधव, दिलीप चित्ते, शिबू नायर, प्रवीण सोनवणे, प्रकाश देशमुख आदि सहभागी झाले होते. संपावर तत्कालीक तोडगा निघाला आणि कारखाना सुरू होणार कळताच आयटीआय येथे कामगारांनी जल्लोष केला. यानंतर सायंकाळी सात वाजेपासून क्रॉम्प्टनचे कामकाज पूर्ववत सुरू झाले.

Add Cropton | क्रॉप्टन जोड

क्रॉप्टन जोड

Next
पकरी कामगारांचे प्रतिनिधी शरद पाटील, चंद्रकांत गुरव, सोमनाथ जाधव, दिलीप चित्ते, शिबू नायर, प्रवीण सोनवणे, प्रकाश देशमुख आदि सहभागी झाले होते. संपावर तत्कालीक तोडगा निघाला आणि कारखाना सुरू होणार कळताच आयटीआय येथे कामगारांनी जल्लोष केला. यानंतर सायंकाळी सात वाजेपासून क्रॉम्प्टनचे कामकाज पूर्ववत सुरू झाले.
..इन्फो..
या मुद्यांवर झाले एकमत
* कंपनी व्यवस्थानाने निलंबित केलेल्या २७ कामगारांना पूर्ववत कामावर घ्यावे; मात्र त्यांची चौकशी पूर्ण करण्यात येईल.
* कामावर हजर होणार्‍या कामगारांना व्यवस्थापनाने प्रेमाची वागणूक द्यावी, कामगारांनीही शिस्तीचे पालन करावे, नियमित उत्पादन द्यावे.
* सध्या कामगारांच्या वतीने जी न्यायालयीन प्रकरणे सुरू आहेत, त्यात न्यायालयाचा निर्णय बंधनकारक आहे.
* कामगार न्यायालयात ज्या १५ कामगारांना कंपनी व्यवस्थापनाने कंटंेम्ट पीटिशन दाखल केलेले आहे. त्यांच्यावर कारवाई न करता व्यवस्थापन मागे घेणार
* औद्योगिक शांतता आणि सलोख्याचे वातावरण निर्माण करावे.
----------
....इन्फो...
व्यवस्थापन- संघटनांची योग्य भूमिका
संपामुळे औद्योगिक अशांतता आणि नाशिक प्रतिमा खालावण्याचा प्रयत्न झाला. परंतु याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. कामगार प्रतिनिधी आणि व्यवस्थापनाने संप मिटवण्यासाठी योग्य भूमिका घेतली. त्यामुळे संप मिटवण्याच्या प्रयत्नांना यश मिळाले.
- आर. एस. जाधव, कामगार उपआयुक्त, नाशिक
-----
चांगला संदेश जाईल
या संपाबाबत मुख्यमंत्री, कामगारमंत्री, पालकमंत्री, लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घातले नाही, ही दुर्दैवी बाब आहे. निमा आणि सीटूलाच लक्ष घालून वाद मिटवावा लागला. कामगार उपआयुक्तांनी पुढाकार घेतला, म्हणून संप मिटला. त्यामुळे नाशिकच्या औद्योगिक वातावरणाबाबत एक चांगला संदेश जाणार आहे. भविष्यात कंपन्यांनी कामगारांच्या मागण्यांचा विचार करावा, आणि कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी.
- डॉ. डी. एल. कराड, प्रदेश सरचिटणीस, सीटू

----
स्वागतार्ह निर्णय
कामगार उपआयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत तोडगा निघाला तो स्वागतार्ह आहे. कामगार आता कामावर हजर झाले आहेत.
- रावसाहेब ढोमसे, प्रतिनिधी, आयटक
-----
कामगार उपआयुक्तांनी सतत पाठपुरावा केल्याने यश मिळाले. औद्योगिक शांतता प्रस्थापित झाली आहे. नवीन गुंतवणूक आणण्यासाठी आता एकत्रित प्रयत्न पुढे जाऊ शकतील.
- संजीव नारंग, अध्यक्ष निमा

Web Title: Add Cropton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.