एमआयडीसी जोड...२

By admin | Published: February 5, 2016 12:33 AM2016-02-05T00:33:05+5:302016-02-05T00:33:05+5:30

विमानतळ होऊन उपयोग नाही

Add MIDC ... 2 | एमआयडीसी जोड...२

एमआयडीसी जोड...२

Next
गाव : अमृत योजनेच्या अंमलबजावणीची तयारी आता गतीने सुरू झाली असून या योजनेंतर्गत शहरातील ९८ हजार कनेक्शनधारकांना चोवीस तास पाणी देण्याचे नियोजन आहे. यासाठी प्रत्येक कनेक्शनवर मीटर लावले जाणार असून अत्याधुनिक यंत्रणेव्दारे पाणी वापरावर लक्षही ठेवले जाणार आहे.
जळगाव महापालिकेचा केंद्राच्या अमृत योजनेत सहभाग झाल्यानंतर त्या संदर्भातील नियोजनाचा अहवाल सादर करण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर विविध कामांसाठी १२४ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. पैकी सुमारे १८ कोटींचा निधी महापालिकेस प्राप्त झाला आहे. निधी प्राप्त झाल्याने आता विविध कामकाजाला गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे. येत्या मार्चमध्ये विविध मक्तेदारांची नियुक्ती करणे व तस्यम कामांना सुरुवात केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
प्रत्येक कनेक्शनवर मीटर
जळगाव शहरास पाणी पुरवठा होत असलेल्या वाघूर योजनेत गेल्या दोन वर्षांपासून जवळपास शंभर टक्के पाणी साठा होत आहे. पाणी मुबलक असल्याने अमृत योजनेच्या माध्यमातून भविष्यात शहरास चोवीस तास पाणी पुरवठा करणेही शक्य होणार आहे. त्यासाठी स्वतंत्र पाईप लाईनही टाकली जाईल. या योजनेत एमआयडीसीतील कस्तुरी हॉटेल ते गिरणा टाकीपर्यंत लोखंडी पाईप लाईन टाकणेही प्रस्तावित आहे. तसेच शहरातील विविध भागातील पाईप लाईन्सही बदलल्या जातील. २४ तास पाणी पुरवठा होणार असल्याने प्रत्येक कनेक्शनवर मीटर बसविले जाईल. या एका मीटरची किंमत जवळपास १५ हजार रुपये असेल. तो खर्चही योजनेतून मिळेल. ग्राहकाने वापलेल्या प्रत्येक थंेबाची नोंद महापालिकेत उभारलेल्या यंत्रणेत होऊन त्यापद्धतीने पाणी वापराचे बिल ग्राहकास दिले जाईल.
---
इन्फो
सार्वजनिक नळ होणार बंद
अमृतच्या योजनेत प्रत्येक नळ कनेक्शनवर मीटर बसणार असल्याने ज्या भागात सार्वजनिक नळ (स्टॅण्ड पोस्ट) असतील तेदेखील बंद केले जाणार आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक स्वत:चे घर असलेल्या व्यक्तीस नळ कनेक्शन घेणे गरजेचे होणार आहे.
---
उद्यानांचे होणार सुशोभिकरण
गेल्या काही वर्षात शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. नव्या वस्त्यांमध्ये घरे झाली पण मोकळ्या राखीव जागा असताना तेथे उद्याने नाहीत. अमृत योजनेंतर्गत उद्यानेही प्रस्तावित आहेत. त्याचे नियोजनदेखील सुरू झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Add MIDC ... 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.