ंमेहरूण बातमी जोड...
By admin | Published: March 29, 2016 12:26 AM2016-03-29T00:26:01+5:302016-03-29T00:26:01+5:30
इन्फो
Next
इ ्फोमेहरूणी नदी ते लेंडी नाला...मेहरूण तलावात पूर्वी मोठ्या प्रमाणात पाणी येत होते. त्याचे प्रमाण कमी...कमी होत गेले. तलावातून निघणारी मेहरूणी नदीचे आता लेंडी नाल्यात रूपांतर झाले आहे. शनिपेठेच्या मागील बाजूने वाहत जात गावाबाहेर ही नदी जात होती. आता या नदीतून केवळ सांडपाणी वाहत असल्याचे लक्षात येते. -----वृक्षारोपणाचा केवळ देखावातलावातील सांडपाण्याचा विषय बर्याच वेळेस गाजला. आजुबाजुच्या परिसरातील सांडपाणी या तलावात सोडले जात असते. त्यास तात्पुरता विरोध होतो. तसेच दुसरा विषय म्हणजे वृक्षापरोपणाचा दर पावसाळ्यात चौपाटीच्या परिसरात वृक्षारोपण केले जाते. त्याचे फोटो प्रसिद्ध झाले की स्वसयंसेवी संघटनेचे निसर्गप्रेमाचे नाट्य संपले. अगदी दरवर्षीच हा प्रकार या परिसरात पहायला मिळतो. त्याची साक्षच जणू श्रीकृष्ण लॉनच्या मागील बाजूस चौपाटीच्या बाजूने असलेले खड्डे देत आहेत. जणू या खड्ड्यांना पुन्हा वृक्षारोपणाची प्रतीक्षा आहे... असेच या भागात दिसून येते. ३५ ते ४० खड्डे या भागात पडलेले दिसून येतात. वृक्षारोपणाच्या या विषयात गांभीर्य बाळगले जात नसल्याचीच प्रचिती येथे येत असून त्यामुळे एक, एक बाबींकडे होणारे दुर्लक्ष तलावाच्या परिसरातील निसर्गाचा र्हास घडविण्यास कारणीभूत ठरत असून शहरातील स्वयंसेवी संस्था, प्रमुख जबाबदारी असलेली महापालिका याप्रश्नी उदासिनच असल्याचे लक्षात येत आहे.