जोड बातमी २ - म्हापसाशात नवीन प्रकल्प येणार

By admin | Published: May 5, 2015 01:21 AM2015-05-05T01:21:45+5:302015-05-05T01:21:45+5:30

सुडातर्फे सुमारे अडीच कोटी रूपये खर्च करून भाजी मार्केटचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पावर पत्र्यांचे छप्पर टाकण्यात येत आहे. या प्रकल्पात सुमारे २०० भाजी विक्रेत्यांची सोय होणार आहे. यातून पालिकेला वर्षांकाठी रूपये महसूल प्राप्त होईल.

Add News 2 - A new project will be held in Mapusa | जोड बातमी २ - म्हापसाशात नवीन प्रकल्प येणार

जोड बातमी २ - म्हापसाशात नवीन प्रकल्प येणार

Next
डातर्फे सुमारे अडीच कोटी रूपये खर्च करून भाजी मार्केटचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पावर पत्र्यांचे छप्पर टाकण्यात येत आहे. या प्रकल्पात सुमारे २०० भाजी विक्रेत्यांची सोय होणार आहे. यातून पालिकेला वर्षांकाठी रूपये महसूल प्राप्त होईल.
दरम्यान, म्हापसा पालिकेने स्वखर्चाने शहरातील अंर्तगत रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे मदत करण्यात आली आहे. म्हापसा येथे नवीन बस स्थानकाचे काम सुरू आहे. त्यासाठी जागा सपाट करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी दिड कोटी रूपये खर्च करण्यात येत आहे. सद्या अस्तिवात असलेल्या बस स्थानकाच्या जागी नवीन बहुमजली पार्कींग इमारत बांधण्यात येईल. तिथे २००० चारचाकी व १००० दुचाकीसाठी पे-पार्किर्ं गची व्यवस्था केली जाईल.

चौकट :
म्हापशात व्यापारी प्रकल्प...
म्हापसा अलंकार थिएटर असलेल्या पालिकेच्या मालकीच्या जागेत सहामजली व्यापरी प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेणारा ठराव दि. ३० एप्रिल रोजी, घेण्यात आला आहे. तसेच प्रकल्पाच्या प्रत्येक मजल्यावर २५ टक्के जागा राव ब्रदर्सच्या वारसांना मालकी हक्कावर व वार्षिंक बारा हजाराच्या भाडेप˜ीच्या दीर्घ मुदतीच्या करारपत्रावर सरकारच्या मान्यतेने देण्यात आले आहे.

म्हापसा नगरपालिकेची चांगली कामगिरी
म्हापसा पालिकेने चांगली कामगिरी करत घरप˜ी व थकलेले क्षुल्क जम्मा करत सुमारे ८ कोटी रूपये गोळा केले आहे. तसेच सरकारकडून अनुदानित स्वरूपात ४ कोटी रूपये मिळालेले आहे. या प्रकल्पामुळे त्यांना अजून दोन कोटी महसूल मिळणार असल्याचे समजते. तसेच आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी पालिकामंत्री फ्रान्सिस डिसोझा यांना पालिकेच्या कामाचा व महसूल प्राप्तीचा अहवाल दाखवावा लागतो. अशी माहिती मिळालेली आहे.

देर आए दुरूस्त आए...
म्हापसा शहर विकासापासून वंचित राहिले. त्याला नेहमीच सावत्रपणाची वागणूक मिळाली. पालकिा क्षेत्रातील काही कामचुकार किंवा ज्यांनी विकासासाठी व्हिजन डोळ्यापुढे न ठेवल्यामुळे वाताहात झाली. त्यामुळेच शहराच्या विकासाला चालना मिळण्याकरिता तब्बल वीस वर्षांचा अवधी लागल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Add News 2 - A new project will be held in Mapusa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.