जोड बातमी ३ - म्हापशात नवीन प्रकल्प
By Admin | Published: May 5, 2015 01:20 AM2015-05-05T01:20:55+5:302015-05-05T01:20:55+5:30
चौकट
च कट म्हणे पंचवीस वर्षांचे व्हिजन.... म्हापसा हे वाढत बाळ आहे. त्यामुळे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत चाललेली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर येतोच. त्यासाठी तोंडगा काढण्यासाठी पे-पार्किर्ं गची सुविधा करण्यात येणार आहे. हे पे-पार्किर्ं ग पंचव्वीस वर्षांचा व्हिजन डोळ्यासमोर ठेवून उभारण्यात येत असल्याते बोलले जात आहे. मात्र, रस्ता व गटार्यांचे बांधकाम हे योग्य पध्दतीने व भविष्याची संकल्पना मनात बाळगून जनतेच्या हितासाठी केल्यास जास्त फायदा होईल.प्रतिक्रिया म्हापसा शहराचे होणार कायापालटम्हापसा शहरात पहिल्यांदाच मोठी विकास प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे शहराचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. यात तिळमात्र ही शंका नाही. नगरपालिकेतील अभियंते, अकाऊंटण्ट व बाकीचे कर्मचार्यांच्या सांघिक कामगिरी करत आहेत. त्याचाच फायदा शहराला मिळत आहे. याचा प्रत्यय म्हापसावाशियांना पुढील वर्षांत पाहायला मिळणार. या विकास कामांची अंमलबजावणीसाठी पालिकामंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी मौलाचा वाटा घेतल्याचे त्यांनी सांगितले. - रूपा भक्ता (म्हापसा नगरपालिका नगराध्यक्ष)त्रास होणार नसल्याची खात्री...पावसाळ्यात कदंब स्थानकवरील पायलट थांब्यावर पाणी तंुबण्याचा प्रकार सर्रास घडतो. हे नित्याचेच बनले आहे. मात्र, या परिसराचे नूतनीकरण करून चांगल्या पध्दतीने हॉटमिक्स करण्यात आला आहे. तसेच गटार्याची दुरूस्ती केल्याने पाणी रस्त्यावर साचून राहणार नाही. त्याची दखल घेण्यात आली आहे. याचा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. - समीर कळंगुटकर ( पायलट)