३५ लाखांची लाच मागणारा अपर जिल्हाधिकारी ताब्यात
By admin | Published: August 7, 2015 12:06 AM2015-08-07T00:06:55+5:302015-08-07T00:06:55+5:30
- नवीन शर्तीचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची दिली धमकी
Next
- वीन शर्तीचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची दिली धमकीनाशिक : जमीन व्यवहारात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ३५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणारे मालेगावचे अपर जिल्हाधिकारी रामचंद्र बापूराव पवार व त्यांचा खासगी सहकारी दिनेशभाई पंचासरा या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने ताब्यात घेतले आहे.लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्यांनी गुरुवारी सकाळी पवार यांच्या शासकीय कार्यालयाला सील ठोकले, तर सायंकाळी मालेगावच्या महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाच्या समोर असलेल्या त्यांच्या निवासाचीही झडती घेऊन तेथून काही कागदपत्रे ताब्यात घेतली.कासारी (ता. नांदगाव) व नाशिक येथील काही नागरिकांनी नांदगाव तालुक्यातील दोन गावांमधील सुमारे ७५ एकर ८५ गुंठे जमीन खरेदी केली होती. परंतु ही जमीन ही नवीन शर्तींची म्हणजेच मूळ मालकाला शासनाने काही अटी, शर्तींवर दिली होती व अशी जमीन हस्तांतरण करताना विभागीय आयुक्तांची अनुमती घेऊन शासनाच्या तिजोरीत नजराणा भरावा लागतो. परंतु मूळ मालकाने व नंतर जमीन खरेदी करणार्या व्यक्तींनी असा व्यवहार करताना कोणतीही अनुमती घेतली नाही, असे पवार यांचे म्हणणे होते व त्यापोटी त्यांनी जमीन खरेदी करणार्या व्यक्तींना मे महिन्यात नोटीस बजावून फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचा इशारा दिला होता.पवार यांचा सहकारी दिनेशभाई लालजीभाई पंचासरा याने २७ मे रोजी जमीन मालकांची भेट घेऊन प्रकरण मिटविण्यासाठी पवार यांनी आपल्याला पाठविल्याचे सांगितले व कारवाई टाळायची असेल तर ५० लाखांची मागणी केली होती. मात्र नंतर ३५ लाख रुपयांवर सौदा ठरला. मात्र या प्रकरणी जमीन मालकांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. ----भ्रमणध्वनी संभाषणाचा पुरावाया गुन्ह्यात भ्रमणध्वनीवरील संभाषण हा मोठा पुरावा ठरला आहे. पवार यांच्यावतीने बोलणी करण्यास आलेल्या दिनेशभाई पंचासरा याने आपल्या भ्रमणध्वनीवरून पवार व जमीनमालकांचे बोलणे करून दिले होते, त्यात पवार यांनी पैशांची मागणी रास्त असल्याचे सांगून ३५ लाखांवर सौदा पक्का केला होता. त्यानंतर पंचासरा व जमीनमालक यांच्यात सातत्याने पैशांच्या देवाण-घेवाणीवरून बोलणे सुरूच होते. जूनमध्ये तीन दिवस सापळा रचूनही पोलिसांना यश आले नाही. ---काही महिन्यांपूर्वीच मालेगाव येथे दोन लाखांची लाच घेताना प्रांत अधिकार्याला रंगेहाथ पकडल्यानंतर आता अपर जिल्हाधिकारीही सापळ्यात अडकले आहेत. गेल्या ऑगस्टमध्ये मालेगाव अपर जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्वीकारणारे रामचंद्र पवार हे येत्या दहा महिन्यांत निवृत्त होत आहेत.