मालेगावचे अपर जिल्हाधिकारी पवार सक्तीच्या रजेवर
By admin | Published: August 14, 2015 12:05 AM2015-08-14T00:05:34+5:302015-08-14T00:05:34+5:30
नाशिक : लाच प्रकरणात अडकलेले मालेगावचे अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांना विभागीय आयुक्तांनी सक्तीच्या रजेवर पाठविले असून, त्यांच्या जागी नाशिकचे अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांना पदभार देण्यात आला आहे. सोमवारी ज्या काही फायली व निर्णयांवर पवार यांनी स्वाक्षरी केली त्याची माहितीही जिल्हा प्रशासनाने मागविली आहे.
Next
न शिक : लाच प्रकरणात अडकलेले मालेगावचे अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांना विभागीय आयुक्तांनी सक्तीच्या रजेवर पाठविले असून, त्यांच्या जागी नाशिकचे अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांना पदभार देण्यात आला आहे. सोमवारी ज्या काही फायली व निर्णयांवर पवार यांनी स्वाक्षरी केली त्याची माहितीही जिल्हा प्रशासनाने मागविली आहे. गेल्या गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रामचंद्र पवार व त्यांचा सहकारी दिनेशभाई पंचासरा या दोघांना अटक करून ताब्यात घेतले होते. त्यानंतर दोन दिवस त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली. रविवारी न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केल्यानंतर सोमवारी सायंकाळी उशिरा पवार यांनी मालेगाव येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयात हजेरी लावून काही महत्त्वाच्या फायलींवर स्वाक्षर्या केल्या. त्यानंतर मंगळवारपासून पवार कोठे आहेत याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयाला काहीच कल्पना नाही.शनिवारी साजरा होणार्या स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापनदिनी मालेगाव उपविभागीय कार्यालयातील ध्वजारोहण अपर जिल्हाधिकार्यांच्या हस्ते करण्याचा प्रघात आहे; परंतु पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लागल्यामुळे प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला होता. तथापि, विभागीय आयुक्तांनी मालेगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचा अतिरिक्त पदभार भानुदास पालवे यांच्याकडे सोपवून एक प्रकारे पवार यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे.