Adhar Banking: ना OTP ची गरज, ना पिन टाकण्याची कटकट, आधार कार्डद्वारे अशी करा पैशांची देवाण घेवाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 09:44 PM2023-04-03T21:44:18+5:302023-04-03T21:44:40+5:30

Adhar Banking: गेल्या काही काळामध्ये आधार कार्ड हे आपल्या ओळखीचा सर्वात मोठा पुरावा बनले आहे. आज आधार कार्ड हे जवळपास प्रत्येक ठिकाणी अनिवार्य बनले आहे.

Adhar Banking: No need for OTP, no need to enter PIN, transfer money through Aadhaar card | Adhar Banking: ना OTP ची गरज, ना पिन टाकण्याची कटकट, आधार कार्डद्वारे अशी करा पैशांची देवाण घेवाण 

Adhar Banking: ना OTP ची गरज, ना पिन टाकण्याची कटकट, आधार कार्डद्वारे अशी करा पैशांची देवाण घेवाण 

googlenewsNext

गेल्या काही काळामध्ये आधार कार्ड हे आपल्या ओळखीचा सर्वात मोठा पुरावा बनले आहे. आज आधार कार्ड हे जवळपास प्रत्येक ठिकाणी अनिवार्य बनले आहे. आता आधार कार्डचा उपयोग केवळ ओळखपत्र म्हणूनच नाही तर त्याच्या मदतीने तुम्ही पैसेही काढू शकता. एका खात्यामधून दुसऱ्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफरही करू शकता.

हे सर्व आधार इनेबेल्ड पेमेंट सिस्टिममुळे शक्य झाले आहे. ही सिस्टिम नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने डेव्हलप केली आहे. आधार क्रमांक टाकून आणि फिंगरप्रिंटच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन करून डिजिटल देवाण घेवाण केली जाऊ शकते. ही खूप सुरक्षित सुद्धा आहे. कारण यामध्ये बँक डिटेल्स देण्याची आवश्यकता नसेल. 

ही पेमेंट सिस्टिम यूनिफाई़ड पेमेंट इंटरफेस (UPI) या प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. हे एक प्रकारचे बँक आधारित  मॉडेल आहे. ते आधार ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून ATM कियोस्क आणि मोबाईल डिव्हाइसवर ऑनलाइन ट्रान्झॅक्शनला मान्यता देतो. जर तुम्हीही या सर्व्हिसचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर तुमचं आधार कार्ड हे बँक अकाऊंटशी लिंक असणं आवश्यक आहे. जर तुमचं आधार कार्ड बँक अकाऊंटशी लिंक नसेल तर या सिस्टिमच्या माध्यमातून तुम्ही पैशांची देवाण-घेवाण करू शकणार नाही. या सिस्टिमच्या माध्मयातून देवाण घेवाण करण्यासाठी कुठल्याही ओटीपी पिनची आवश्यकता नसेल. एक आधार कार्ड अनेक बँक अकाऊंटशी लिंक केलं जाऊ शकतं.

AePS सिस्टिमच्या माध्यमातून युझर पैसे काढू शकतो. बॅलन्स जाणून घेऊ शकतो. पैसे जमा करू शकतो. आधार बेस्ट पेमेंट सिस्टिम असलेल्या AePS च्या अंतर्गत बॅलन्सची चौकशी, पैसे काढणे, पैसे जमा करणे, आधार वरून आधारवर ट्रान्सफर, पेमेंट, देवाण-घेवाण आणि या प्रकारच्या इतर सेवा येतात. ही सर्व्हिस ग्राहकांना डोअरस्टेप बँकिंग करण्यासाठी आणि कुठल्याही शाखेत गेल्याशिवाय पायाभूत सुविधांचा लाभ घेण्यासाठी परवानगी देतो. 

असा करा व्यवहार 
आधार इनबेल्ड पेमेंट सिस्टिमचा वापर तुम्ही बँकिंग करस्पॉन्डेंटजवळ जाऊनच करू शकता. किंवा त्याला घरी बोलावून या सेवेचा लाभ घेऊ शकता. कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएसई) चे संचालकसुद्धा ही सेवा उपलब्ध करून देतात. बँकिंग करस्पॉँडंटना बँकांनी डिजिटल देवाण-घेवाणीसाठी अधिकृत केले आहे.  

Web Title: Adhar Banking: No need for OTP, no need to enter PIN, transfer money through Aadhaar card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.